शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात आलेले आसामचे माजी पोलिस महासंचालक शंकर बारुआ यांनी आत्महत्या केल्याची माहिती बुधवारी गुवाहाटी पोलिसांनी दिली.
गुवाहाटी – शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात आलेले आसामचे माजी पोलिस महासंचालक शंकर बारुआ यांनी आत्महत्या केल्याची माहिती बुधवारी गुवाहाटी पोलिसांनी दिली. बारुआ यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली.
बारुआ यांच्या आत्महत्येप्रकरणी आम्ही तपास करीत आहोत. सध्या तरी आम्ही याबाबत काही बोलू शकत नाही. तपासानंतरच अधिक माहिती समजू शकेल, असे गुवाहाटी पोलिस अधीक्षक ए.पी.तिवारी यांनी सांगितले. बारुआ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
‘गेल्याच आठवड्यात बारुआ यांना हृदय आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर बुधवारी सकाळीच त्यांना घरी आणले होते. घरी आणल्यावर काही वेळानंतर ते गच्चीवर गेले आणि स्वत:वर गोळी झाडून घेतली, असे बारुआ यांच्या कुटुंबातील निकटवर्तीयांनी सांगितले.
शारदा चिटफंड घोटाळ्याता बारुआ यांचा सहभाग असल्याच्या आरोपावरुन सीबीआयकडून त्यांची चौकशी करण्यात आली होती तसेच याप्रकरणी सीबीआयने माजी आरोग्यमंत्री हिमाता बिस्वा शर्मा, बारुआ आणि गोगोई यांच्यासह अनेक वरिष्ठांच्या घरावर छापेही टाकले होते.
वा ! काय न्यूज आहे !!!