विद्यार्थी व ग्रामस्थांना लोकशाही प्रक्रिया समजावी, प्रत्येकाला हक्काने मतदान करता यावे, यासाठी डहाणू जिल्हा परिषद वाकीपाडा-वाणगाव शाळेने ‘मतदार जागृती अभियान’ शुक्रवारी दस-यानिमित्त राबवले.
डहाणू – विद्यार्थी व ग्रामस्थांना लोकशाही प्रक्रिया समजावी, प्रत्येकाला हक्काने मतदान करता यावे, यासाठी डहाणू जिल्हा परिषद वाकीपाडा-वाणगाव शाळेने ‘मतदार जागृती अभियान’ शुक्रवारी दस-यानिमित्त राबवले.
दस-याच्या दिवशी आपटय़ांच्या पानांना विशेष महत्त्व असते. ही पाने एकमेकांना सोने म्हणून दिली जातात. हाच धागा पकडून आपटय़ाच्या पानांवर मतदार जागृतीचे घोषवाक्य लिहून शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी गाव-पाडय़ातील घराघरात जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी या पानावर लिहिलेला संदेश वाचून दाखवला आणि निवडणुकीत जबाबदारीने मतदानाचा हक्क बजावण्याची विनंती केली.
‘मत दे ना यार’, ‘फरक पडतो’, ‘आपलं मत, आपली ताकद’, ‘मतदान करा, देशाला तारा’, ‘मताची जागृती, देशाची प्रगती’, ‘आपलं मत, आपलं भविष्य’, ‘मतदान’, ‘सर्वश्रेष्ठ दान’, ‘मतदान करा, देश वाचवा’ इत्यादी शुभ संदेश या पानांवर लिहिण्यात आले होते. प्रमुख शिक्षक विजय वाघमारे, केंद्रप्रमुख संगीता पाटील यांनी मतदानाची प्रक्रिया समजावून सांगितली.
लोकशाहीची हाक वाढवा मतदानाचा धाक