उधमपूर दहशतवादी हल्ल्यानंतर जिवंत हाती लागलेला पाकिस्तानी अतिरेकी नावेद उस्मान उर्फ कासिम खान याला आसरा देणा-या व्यक्तीला शनिवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली.
श्रीनगर – उधमपूर दहशतवादी हल्ल्यानंतर जिवंत हाती लागलेला पाकिस्तानी अतिरेकी नावेद उस्मान उर्फ कासिम खान याला आसरा देणा-या व्यक्तीला शनिवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली.
तीन दिवसांपूर्वी उधमपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या बसवर हल्ला करुन पळून जात असताना नावेद उस्मानला स्थानिक गावक-यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाबनंतर जिवंत पकडलेला नावेद दुसरा पाकिस्तानी दहशतवादी आहे.
नावेद उस्मानला उधमपूरपर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांची ओळख पटवण्यासाठी शनिवारी सुरक्षा पथके नावेदला घेऊन काश्मीर खो-यात आली होती. नावेद सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोठडीमध्ये आहे.
नावेद ज्या रस्तेमार्गाने उधमपूरपर्यंत पोहोचला त्याच मार्गाने त्याला काश्मीरमध्ये आणण्यात आले. नावेद उस्मानने तो पाकिस्तानच्या फैसलाबादचा रहिवाशी असल्याचे कबूल केले आहे मात्र पाकिस्तानने नावेद उस्मानला आपल्या देशाचा नागरीक मानण्यास नकार दिला आहे.
नावेद आणि त्याच्या साथीदाराने उधमपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या बसवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये बीएसएफचे दोन जवान शहीद झाले होते.
अरे कोणी मनोहर पर्रीकर साहेबाना झोपेतून उठवतील काय?