अॅपलचे सर्वात ताजी आवृत्ती असलेल्या आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लस स्वस्तात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली- अॅपलचे सर्वात ताजी आवृत्ती असलेल्या आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लस स्वस्तात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या वितरकांनी दोन सवलतीच्या योजना जाहीर केल्या आहेत.
यापैकी एक योजना अशी आहे की, ग्राहक आपल्याकडील सध्याच्या किमान ९,००० रुपयांच्या हँडसेटच्या बदल्यात आयफोन ६ घेऊ शकतील. तर दुस-या ऑफरनुसार, आयफोन ६ प्लस २० टक्के रक्कम आधी भरून घेऊन जाता येईल व उर्वरित रक्कम ८ मासिक हप्त्यांत भरता येईल.
बीटल, इनग्राम मायक्रो, रेडिंग्टन इंडिया आणि राशी पेरिफेरल्स यांच्यामार्फत भारतात अॅपलची उत्पादने वितरित केली जातात. बजाज फिनान्शियल सर्व्हिसेस व क्रेडिट कार्ड कंपन्यांनी यासाठी निधी दिला असून २७ मार्चपर्यंत या ऑफर वैध आहेत. अॅपलने भारतातील वितरकांना किमती कमी करून उत्पादने विकण्यास परवानगी दिल्यानंतर काही आठवडय़ानी हा निर्णय आला आहे.
याचे कारण अॅपलचे सर्वाधिक मोठी बाजारपेठ असलेल्या चीनमध्ये मंदी आहे. त्यामुळे अॅपलने आता भारतावर लक्ष केंद्रित केले असून सरासरी वय २७ असलेल्या भारतीय युवकांची संख्या लक्षणीय असल्याने हा निर्णय घेतल्याचे अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी सांगितले. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत अॅपलच्या कमाईचा अहवाल दिलाआणि प्रथमच उत्पन्नात तूट येईल, असे भाकीत वर्तवले तेव्हा भारत हा उभरती बाजारपेठ म्हणून कंपनीसमोर उभा राहिला.
कुक म्हणाले की, भारतातील लोकसंख्याही आमच्या ब्रँडसाठी ज्यांना सर्वोत्कृष्ट उत्पादनाची उत्सुकता असते, अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. अनेक सेवा पुरवठादारांनी थ्री-जी आणि फोर-जी सेवा सुरू केली असताना, मोबाईल फोन्सचा वापर वाढला असताना तसेच इंटरनेट सेवांची किमत कमी होत असताना अॅपलने भारतातील आपला व्यवसाय पणाला लावला आहे.
कोणीही चीन मेड MOBILE घेऊ नये. चीनचा माज उतरावा आणि इंडियासाठी मेड इन इंडियाची कास धरू या…