आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आलेले प्रशांत भूषण यांनी पुन्हा एकदा ‘आप’चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या टीकेची तोफ डागली आहे.
नवी दिल्ली – आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आलेले प्रशांत भूषण यांनी पुन्हा एकदा ‘आप’चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या टीकेची तोफ डागली आहे.
केजरीवाल हे हुकुमशाही करत असल्याचा आरोप करत त्यांनी खुल्या पत्रातून केजरीवालांवर टीका केली आहे. तुम्ही जे पक्षाबाबत करत आहात त्यामुळे देव आणि इतिहास तुम्हाला कधीही माफ करणार नाही असे भूषण यांनी पत्रात म्हटले आहे.
गेल्या महिन्यात २८ मार्चला पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत दैदीप्यमान यश मिळवल्यानंतर तुम्ही तुमच्यातील चांगले गुण देशातील जनतेला दाखवायला हवेत. मात्र दुर्देवाने तुमचे अवगुण लोकांना दिसत आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही लोकपाल, आमची आणि इतरांची हकालपट्टी केली त्यावरुन रशियन हुकूमशाह स्टॅलिनची आठवण होते, असे भूषण यांनी पत्रात सांगितले आहे.
आप पक्ष स्थापन कऱण्यामागे आपले स्वच्छ कारभार आणि भ्रष्टाचार मुक्त देशाचे स्वप्न होते. मात्र ज्याप्रमाणे आता तुम्ही वागत आहात आणि तुमची प्रतिमा तयार होत आहे त्यावरुन स्वच्छ कारभार आणि भ्रष्टाचार मुक्त भारत हे केवळ दु:स्वप्नच राहिल असे मला वाटते. असे भूषण पत्राद्वारे म्हणाले.
दरम्यान,२८ मार्च रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान केजरीवाल यांनी आपल्यावर तसेच वडील शांती भूषण आणि योगेंद्र यादव यांच्यावर केलेले सर्व आरोप चुकीचे आणि प्रक्षोभक असल्याचे सांगत भूषण यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.
prashant bhushan murkha ahe kay .raja yek asato pradhan yek asato senapati yek asato khajindar yek asato sardar anek asatat .rajavar sarwanchi jababdari असते.राजाचा विरोधात fakat जनता बोलते.सरदारांनी राजाचा विरोधात kahi bolayche nasate.तरच rajyacha karbhar सुरळीत चालतो