रेल्वे कर्मचा-यांनी अथक प्रयत्न करुन सोमवारी सकाळी सातच्या सुमारास चर्चगेट रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरुन अपघातग्रस्त लोकल हटवली.
मुंबई – रेल्वे कर्मचा-यांनी अथक प्रयत्न करुन सोमवारी सकाळी सातच्या सुमारास चर्चगेट रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरुन अपघातग्रस्त लोकल हटवली. हा फलाट मोकळा झाल्यानंतर, तुटलेल्या ओव्हरहे़ड वायरच्या दुरुस्तीसाठी काही वेळ या फलाटावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सकाळी अकराच्या सुमारास या फलाटावरुन पहिली लोकल रवान झाली.
अपघातानंतर फलाट क्रमांक तीन वर येणा-या गाडया फलाट क्रमांक चारवर वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचा वेग काहीसा मंदावला होता. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास चर्चगेट स्थानकात आलेली भाईँदर लोकल फलाटावर थांबण्याऐवजी बफरला धडकून थेट फलाटावर चढल्याने भीषण अपघात झाला होता.
या भीषण अपघातात मोटरमनच्या केबिनसह लोकलचा पहिला डब्बा हवेत उडून थेट फलाटावर आला होता. कालपासून फलाटावर आलेले हे डब्बे हटवण्याचे काम सुरु होते. अखेर आज सकाळी हे काम पूर्ण झाले.
रविवारी सुट्टीच्या दिवशी हा अपघात झाल्याने सुदैवाने मोठी जिवितहानी टळली. दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या अपघाता प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.
मोटरमनने केले कॉल रेकॉर्ड डिलिट
दरम्यान, हा अपघात मानवी चुकांमुळे झाला असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असून मोटरमनकडील मोबाईल फोनची तपासणी केली असता सर्व कॉल डिलिट करण्यात आल्याने शंका उपस्थित होत आहे, असे सुनीलकुमार सुद यांनी सांगितले आहे. याची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
तीन जण निलंबित
या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले असून लोकलचा मोटरमन एल. एस. तिवारी, गार्ड अजय गोहिल व लोको निरीक्षक एम. जी. वर्मा यांना निलंबित केले आहे, असे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांनी सांगितले.
या तिघांना आता सांगा ,कि यु पी ला जावून चणे विका,