पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने दोषी ठरवले आहे.
नवी दिल्ली- पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने दोषी ठरवले आहे.
आयपीएलच्या फ्रँचायझीच्या लिलावादरम्यान दोन संघाना झुकते माप दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. समितीने दोषी ठरवल्यामुळे मोदींवर आजीवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.
आयपीएलच्या पहिल्या तीन हंगामामध्ये मोदी हे अध्यक्ष होते. लिलावादरम्यान दोन संघांना झुकते माप दिल्यामुळे २०१०च्या आयपीएलमधील अंतिम सामन्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते.
या संदर्भात शिस्तपालन समितीने अहवाल सादर केला असून मोदींवर आजीवन बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.
good move.