भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) मुंबईमध्ये कार्यरत असलेले अधिकारी कृष्णप्रकाश यांनी जगातील फ्रान्स ट्रायथ्लॉन स्पर्धा जिंकली.
मुंबई- भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) मुंबईमध्ये कार्यरत असलेले अधिकारी कृष्णप्रकाश यांनी जगातील फ्रान्स ट्रायथ्लॉन स्पर्धा जिंकली. जगातील सर्वात खडतर अशी ट्रायथ्लॉन स्पर्धा त्यांनी १४ तास आठ मिनिटांत पूर्ण केले. मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणनंतर फ्रान्स ट्रायथ्लॉन जिंकणारे कृष्णप्रकाश हे दुसरे भारतीय तसेच भारतातले पहिले पोलीस अधिकारी आहेत.
ट्रायथ्लॉनमध्ये धावणे, पोहणे आणि सायकल चालवणे या तीन क्रीडा प्रकारांचा समावेश असतो. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी १७ तासांचा अवधी असतो, मिलिंद सोमणने १५ तासांत ‘रेस’ पूर्ण केली होती. कृष्णप्रकाश यांनी ३.८६ किलोमीटर पोहणे, ४२.२ किलोमीटर धावणे आणि १८०.२ किलोमीटर सायकलिंग अवघ्या १४ तास ८ मिनिटांत पूर्ण करून भारतीयांतर्फे नवा विक्रम नोंदवला.
कृष्णप्रकाश हे १९९८ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्हय़ांमध्ये महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. २०१२ मध्ये मुंबईत अतिरिक्त आयुक्त (दक्षिण विभाग) म्हणून बदली झाली. केवळ ट्रायथ्लॉन नव्हे तर अनेक मॅरॅथॉनमध्येही कृष्णप्रकाश यांनी सहभाग दर्शवला आहे. २०१३मध्ये त्यांनी मुंबई मॅरॅथॉनमध्ये भाग घेत अर्ध मॅरेथॉन पूर्ण केली. त्यानंतर मुंबईसह अन्य मॅरॅथॉनमध्येही भाग घेत आहेत. पोलीस सेवा बजावतानाच आपला छंद जोपासणा-या कृष्णप्रकाश यांनी युवा पिढीसमोर नवा आदर्श ठेवला आहे.
[EPSB]
[/EPSB]
श्री कृष्णकुमार हे महाराष्ट्रात जे मोजके पोलीस अधिकारी कर्तव्य कठोर व सडेतोड म्हणून ओळखले जातात त्यातील एक आहेत.त्यांनी नगर व सांगली ला असताना भल्या भल्या राजकीय फुडारी मंडळीना आपल्या नो नोनसेनस कार्य प्रणालीचा तडाखा दिला होता.अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याने फ्रांस मध्ये झालेल्या कठीणतम ट्रायक्लोथान स्पर्धेत जे यश मिळविले त्याबद्धल त्यांचे अभिनंदन.