योगगुरू रामदेवबाबा याच्या ‘पतंजली समूहा’ने नागपुरातील मिहान प्रकल्पात अतिशय स्वस्तात २३० एकर जमीन घेऊन एकच खळबळ उडवून दिली.
नागपूर- योगगुरू रामदेवबाबा याच्या ‘पतंजली समूहा’ने नागपुरातील मिहान प्रकल्पात अतिशय स्वस्तात २३० एकर जमीन घेऊन एकच खळबळ उडवून दिली. पतंजली आयुर्वेदने या जमिनीसाठी २५.५० लाख रुपये एकर या हिशोबाने मंगळवारी मिहानची व्यवस्था पाहणा-या एमएडीसी म्हणजे महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या खात्यात पैसेही भरले. रामदेवबाबा इथे फुड पार्क सुरू करणार आहेत.
ब-याच वर्षानंतर मोठा उद्योग मिहान प्रकल्पात आला आहे. पण रामदेवबाबाला ही जमीन अतिशय स्वस्तात मिळाल्याची चर्चा उद्योग वर्तुळात आहे. या संपूर्ण जमिनीचा बाजारभाव १ हजार कोटी रुपयांच्या आसपास जातो, असे या क्षेत्रातील लोकांचे म्हणणे आहे. पण बाबाला ६० कोटी रुपयांमध्ये गणित जमवले. बाबाच्या या ‘अर्थासना’वर वादळ उठले आहे.
मिहान प्रकल्पात दोन प्रकारच्या जागा आहेत. विशेष आí७दज-डत म्हणजे एसईझेडमध्ये जागेचा दर ६० लाख रुपये एकर आहे. या क्षेत्राच्या बाहेर जास्त दर आहे. ४-४ कोटी रुपये एकर भावाने जमीन घेऊन बिल्डर्सने इथे टाउनशिप उभारल्या आहेत.
बाबाच्या कंपनीला मात्र एमएडीसीने सर्वात कमी भाव लावला आहे. ३० वर्षाच्या लीजवर ही जागा दिली आहे. बाबानी फुड पार्क सुरूकरण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर एमएडीसीने निविदा काढली. पण चार वेळा निविदा काढूनही ‘पतंजली’शिवाय दुस-या कुणाचा
प्रतिसाद मिळाला नाही.
अखेर दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार एकमेव अर्ज असलेल्या ‘पतंजली’ला जागा देण्याचा निर्णय करण्यात आला. मुळात हा फूड पार्क सुरु करण्यासाठी ‘पतंजलीला सोयीच्या अटी ठेवण्यात आल्या, असा सूर आता उमटू लागला आहे. वर्षाला १०० कोटी रुपयाचा माल शेतक-यांकडून खरेदी करावा लागेल, ही त्यातली एक अट होती.
लोकसभा निवडणुकीत रामदेवबाबा यांनी भाजप आणि मोदी यांना पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड मोदी यांच्याकडून सुरु झाली आहे, असे बोलले जात आहे. येत्या १० सप्टेंबर रोजी मिहानमध्ये या फूड पार्कचे भूमिपूजन होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खुद्द रामदेव बाबा उपस्थित राहणार आहेत. या पार्कमुळे ५ हजार लोकांना रोजगार मिळेल तसेच या भागातील शेतकरयांना फायदा होईल असा बाबांचा दावा आहे.
sahab hey sarva shetaji bataji sarkar baba lokanchay ghar bharun maharashtrtala bikari banwanir ahay.