सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने त्यांच्या बहुप्रतीक्षित सॅमसंग गॅलॅक्सी एस ७ आणि गॅलॅक्सी एस ७ एज या मोबाईल्सचे अनावरण भारतीय बाजारपेठेत केले.
नागपूर- सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने त्यांच्या बहुप्रतीक्षित सॅमसंग गॅलॅक्सी एस ७ आणि गॅलॅक्सी एस ७ एज या मोबाईल्सचे अनावरण भारतीय बाजारपेठेत केले.
अनेक पथदर्शक नवीन शोधांमध्ये गॅलॅक्सी एस ७ आणि गॅलॅक्सी एस ७ एजमधून उत्तम डिझाईन भाषा, अद्ययावत इमेजिंग क्षमता, उत्तम सॉफ्टवेअर कार्यक्षमता आणि अभूतपूर्व संपर्क क्षमता विविध प्रकारच्या सेवा व अनुभवांसह दिली जाते. आम्ही आमच्या १९८८ सालच्या पहिल्या मोबाईल फोनपासून आतापर्यंतच्या गॅलॅक्सी एस स्मार्टफोन्सच्या मोबाईल साधनांमध्ये घडवलेली उत्क्रांती पाहताना मला खूप अभिमान वाटतो.
गॅलॅक्सी एस ७ आणि गॅलॅक्सी एस ७ एजने स्मार्टफोन काय असू शकतो याची नव्याने कल्पना करून एक मोठा टप्पा पार केला आहे, असे मत सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्सचे व्यवस्थापकीय संचालक केन कांग यांनी व्यक्त केले.
सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक मनू शर्मा म्हणाले की, गॅलॅक्सी एस ७ आणि एस ७ एजमुळे ग्राहकांना एक उत्तम स्मार्टफोनचा अनुभव मिळेल. कॅमेरा, डय़ुएल पिक्सेल तंत्रज्ञानासारखे नवीन शोध एक उजळ आणि उत्तम दर्जाची छायाचित्रे कमी प्रकाशातही देतात.
गॅलॅक्सी एस ७ आणि गॅलॅक्सी एस ७ एज अनुक्रमे ४८,९०० रुपये (३२ जीबी) आणि ५६,९०० (३२ जीबी) या किमतीत उपलब्ध आहेत.
लवकरच मोबाईल मध्ये स्वीट डीश बघून भारतीय आपली जेवणाची भूक भागवतील.आणि मोबाईल बनवणारे विदेशी कोंबडीची तंगडी मजेत खातील.मुर्ख भारतीय शहाणे होणार कधी.