चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेची काहीच माहिती नसलेले निर्माते पूर्णपणे इतरांवर अवलंबून राहिल्याने फसतात. त्यांना चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेची किमान तोंडओळख व्हावी, या हेतूने डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी चित्रपट कसा काढावा, हे पुस्तक लिहिले आहे.
गेल्या काही वर्षात मराठीतल्या चित्रपटनिर्मितीची संख्या कमालीची वाढली आहे. अनेक नवे निर्माते येत आहेत. काही जण एकाच चित्रपटापुरती निर्मिती करतात व नंतर काही करत नाहीत. आपण फसवलो गेल्याची भावनाही अनेक निर्मात्यांच्या मनात निर्माण होते. चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेची काहीच माहिती नसलेले हे निर्माते पूर्णपणे इतरांवर अवलंबून राहिल्याने फसतात. त्यांना चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेची किमान तोंडओळख व्हावी, या हेतूने डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी चित्रपट कसा काढावा, हे पुस्तक लिहिले आहे.
या पुस्तकात त्यांनी चित्रपटनिर्मिती प्रक्रियेच्या सुरुवातीपासून ते चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंतच्या सर्व गोष्टींची माहिती दिली आहे, पण पुस्तकाचा आकार पाहूनच हे पुस्तक म्हणजे केवळ विषयाची ओळख आहे हे लगेच लक्षात येते. पुस्तकात त्यांनी काही उदाहरणेही दिलेली आहेत. त्याच प्रकारे चित्रपट क्षेत्राविषयीच्या अनेक समज-गैरसमजाचाही आढावा घेण्यात आलेला आहे. सिनेमातल्या अनेक तांत्रिक बाबींबरोबरच सिनेमानिर्मिती व गुंतवलेला पैसा परत मिळवण्याचे अनेक मार्गही सांगितले आहेत. नव्या निर्मात्यांना असणा-या संभाव्य धोक्यांची माहितीही देण्यात आलेली आहे. डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी स्वत: चित्रपट निर्मिती केलेली असल्याने त्यांचे हे पुस्तक बरेचसे स्वानुभवावर बेतल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे, या पुस्तकात चित्रपटात प्राण्यांच्या वापर करायचा असल्यास त्यासाठी कुठून, कशी परवानगी घ्यायची हेही नमूद केले आहे. इतकेच नव्हे तर या क्षेत्रात येऊ इच्छिणा-या तरुण मुलींसाठीही महत्त्वाचे मार्गदर्शन केलेले आहे. घुमटकर यांनी आपल्या पुस्तकात चित्रपट निर्मितीतल्या सर्वच अंगांचा विचार केला असला तरी तो त्रोटक आहे. त्यातही या चित्रपट निर्मितीतल्या सर्वच घटकांचा अधिक साकल्याने विचार करण्यात आला असता तर हे पुस्तक अधिकच सर्वसमावेशक झाले असते, यात शंका नाही.
मला हवय हे पुस्तक… कुठे मिळेल???
पुस्तक कुठे मिळेल सांगु शकता का
सर मला चित्रपट कसा काढवा हे पुस्तक पाहिजे ते कसे मिळेल
औरंगाबाद चिकलठाणा बीड रोड झाल्टा
सर तुम्ही इच्छुक आहे का मला कॉन्टॅक्ट करा मो. 7219012058
मला चित्रपट बनवायचा आहे
मला पण चित्रपठ बनवायचा आहे. अणि पुस्तक ही लिहायच आहे
मला स्वताच्या भूतकालाबद्दल काही पुस्तके लिहायची आहेत
माझ्याकडे स्टोरी आहे सगळी पण पुस्तक लिहायला लागणारी माहिती नाही
कोणी मदत करेल का
मला यावरती short movie ही बनवायची आहे
पुस्तक कोठे मिळेल