भारतीय रिझर्व्ह बँक पुढील वर्षी म्हणजेच २०१५ मध्ये प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणण्यांसदर्भात विचाराधीन आहे.
नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँक पुढील वर्षी म्हणजेच २०१५ मध्ये प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणण्यांसदर्भात विचाराधीन आहे.
प्लॅस्टिकच्या चलनी नोट लवकरच येत आहेत. शिमलासह पाच शहरात सुरुवातीला प्लॅस्टिकच्या चलनी नोटांचा वापर करण्यात येणार असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी मे महिन्यातील मंडळाच्या बैठकीनंतर सांगितले होते.
या प्लॅस्टिकच्या चलनी नोटा सुरुवातीला कोची, मैसूर, जयपूर, भुवनेश्वनर आणि शिमला या शहरांमध्ये चलनात आणल्या जाणार आहेत. त्यांनंतर देशांतील अन्य शहरांमध्ये प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणल्या जाणार आहेत.
प्लॅस्टिकच्या नोटा या कागदी नोटांप्रमाणे लवकर खराब होत नाहीत तसेच फाटतही नाहीत. तसेच प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणल्याने नकली नोटांच्या वापरावर काही प्रमाणात आळा बसेल.
चांगली योजना आहे , ग्रामीण भागात लवकर सुरु करा आणि लोकांना त्याचा फायदा होईल असे निर्णय घ्या .