धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यासाठी शनिवारी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.
मुंबई- धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यासाठी शनिवारी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. या प्रकरणी भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेचे नेते हेमंत पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे.
धनगरांना अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे, यासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठे आंदोलन उभे राहिले होते. त्यावेळी भाजपाचे सरकार आले तर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर समाजाला आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन तत्कालीन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
मात्र, दोन वर्षे होऊन गेली तरी अद्याप धनगर आरक्षणासंदर्भात फडणवीस सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, यामुळे धनगर समाजाच्या मनात असंतोष खदखदत आहे.
महापालिका-जिल्हा परिषदा निवडणुकीत भाजपाकडून धनगर आरक्षणाचे गाजर दाखवले जात आहे. सरकारच्या या भूलथापांना बळी न पडता आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय होण्यासाठी भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी संघटनेच्या माध्यमातून १९ फेब्रुवारीला जेलभरो आंदोलनाची हाक दिली होती.
मात्र, नियोजित वेळेआधीच आंदोलन करत त्यांनी पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी पाटील यांनी पुणे येथे उपोषण केले होते. त्यावेळी भाजपा नेत्यांनी आरक्षणाचे आश्वासन दिले होते.
त्यानंतर पुन्हा आझाद मैदानात आंदोलन करावे लागले, तरी फडणवीस सरकार चालढकल करत असल्याने जेलभरो आंदोलन करावे लागत असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. यापुढेही सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही, तर हजारो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
It’s not good to include dhangar in ST category ,if govt. want to give reservation to them ,then give separate reservation but don’t include them in ST .JAI AADIVASI
धनगरांना nt-c मधून ३.५% आरक्षण मिळत असतांना, आदिवासी मधून आरक्षणाचा हट्ट कशासाठी?
यात राजकारण आहे.