अमेरिकेच्या न्यू इंग्लंड ब्रुअविंग या कंपनीने त्यांच्या बीअरच्या बाटलीवरील राष्ट्रपिता महात्मा गांधींचे चित्र आणि नाव काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
मिलफोर्ड, कनेक्टिकट – भारतीयांकडून झालेल्या तीव्र विरोधानंतर अमेरिकेच्या न्यू इंग्लंड ब्रुअविंग या कंपनीने त्यांच्या बीअरच्या बाटलीवरील राष्ट्रपिता महात्मा गांधींचे चित्र आणि नाव काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील कनेक्टिकट राज्यातील न्यू इंग्लंड ब्रुअविंग कंपनीने ‘गांधी-बोट’ या नावाने बीअर ब्रॅँड बाजारात आणला. मात्र महात्मा गांधीचे नाव आणि चित्र बीअरच्या बाटलीवर छापल्याने भारतीय नागरिकांकडून तीव्र निषेध केला गेला होता. या प्रकरणी हैदराबाद येथील न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती.
‘गांधी-बोट’चे नामांतर करण्याचे आम्ही ठरवले आहे. भारतीय-अमेरिकन व्यापारी, धर्मगुरु आणि राज्य अधिका-यांशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने पत्रकात म्हटले आहे.
चांगला निर्णय… याला म्हणतात माणुसकी…