जगातील दोन तृतीयांश भागात इंटरनेट पोहचलेले नाही. इंटरनेट आहे रे आणि नाही रे वर्गातील दरी दूर करण्यासाठी फेसबुकने पुढाकार घेतला आहे.
वॉशिंग्टन- जगभरात इंटरनेटचे जाळे वेगाने पसरत आहे. या इंटरनेटच्या जाळ्याने जग जवळ येत आहे. तरीही जगातील दोन तृतीयांश भागात इंटरनेट पोहचलेले नाही. इंटरनेट आहे रे आणि नाही रे वर्गातील दरी दूर करण्यासाठी फेसबुकने पुढाकार घेतला आहे. त्याने ड्रोनच्या सहाय्याने इंटरनेट जगभर पोहचवण्याचे ठरवले आहे.
फेसबुक कनेक्टिव्हिटी लॅब आणि इंटरनेट.ऑर्ग यांच्या सहाय्याने जगभरात इंटरनेट पोहचवण्याबाबत करार झाला. इंटरनेटचे जाळे पसरण्यासाठी होणारा अब्जावधी डॉलर्सचा खर्च वाचवण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारे ड्रोन वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.
न्यूयॉर्क येथे गेल्या आठवडयात सामाजिक शिखर परिषद घेण्यात आली. त्यात फेसबुक कनेक्टिव्हिटी लॅबचे संचालक येल मॅग्युरी उपस्थित होते. त्यांनी फेसबुकचे भविष्यातील ध्येयधोरण स्पष्ट केले. अमेरिकेत २०१५ मध्ये फेसबुकच्या इंटरनेट ड्रोनच्या चाचण्या सुरू होणार आहेत. ही ड्रोन विमाने काही महिने वातावरणाच्या बाहेर उडणार आहेत. जवळपास ६० ते ९० हजार उंचीवरून ती उडतील. या भागात व्यापारी विमाने उडत नाहीत. ही विमाने व्यावसायिक विमानांच्या आकाराएवढीच असतील, असे त्यांनी सांगितले.
फेसबुक कनेक्टिव्हिटी लॅब सध्या याबाबतची धोरणे बनवण्याचे काम करत आहे. सध्या एका विमानाला एक वैमानिक लागतो. मात्र सौर ऊर्जेवर चालणारी १०० विमाने एक वैमानिक चालवू शकतो का ? यावर संशोधन सुरू आहे. कारण जगभरात विमाने पाठवायची असल्याने प्रत्येक विमानाला स्वतंत्रपणे नियंत्रित करणे शक्य ठरणार नाही. त्यासाठी भरपूर खर्च होईल, असेही ते म्हणाले.
फेस बुक का नया फंडा !!!!