गणेशोत्सवात ‘लालबागचा राजा’ गणेश मंडळाने सर्वाधिक वीजचोरी केल्याचे उघड झाले आहे.
मुंबई- गणेशोत्सवात ‘लालबागचा राजा’ गणेश मंडळाने सर्वाधिक वीजचोरी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मंडळाकडून दंड म्हणून २१ हजार ८३३ रुपयांची वसुली केल्याची माहिती बेस्टने मंगळवारी उच्च न्यायालयात दिली.
माजी पत्रकार केतन तिरोडकर यांनी गणेशोत्सवात गणेशोत्सव मंडळ करत असलेल्या वीज चोरीप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली होती. वीजचोरी करणा-या मंडळांवर बेस्ट, महापालिका आणि पोलिसांनी फौजदारी खटले दाखल करावेत, अशी मागणी केली होती. त्यावर बेस्टने या मंडळाकडून २१ हजार ८३३ रुपयांची वसुली केल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले.
वीज चोरीप्रकरणी एकूण ३९ मंडळांकडून तब्बल एक लाखांहून अधिक वसुली केल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. न्या. पी. व्ही. हरदास आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठापुढे हे प्रतिज्ञापत्रात सादर केले. माटुंगा लेबर कँपमधील विजय बालाजी मित्र मंडळाकडून आठ हजार ५४८ रुपये वसूल केले आहेत.
Baba Lalbaug chya Maharaja Kai yaikto/vacahto me hye??? Tuzya darbarat shkya tari Aahe ka Hye ???