उत्तर कोरियाला बुधवारी ५.१ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले असून हे भूकंपाचे धक्के नसून आण्विक चाचणी केल्याचे संकेत असल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे.
उत्तर कोरिया- उत्तर कोरियाला बुधवारी ५.१ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र हे भूकंपाचे धक्के नसून हायड्रोजन बॉम्बची आण्विक चाचणी केल्याचे संकेत असल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे. बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास हे धक्के जाणवले.
उत्तर कोरीयातील न्युक्लिअर टेस्ट साईटजवळ हे भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. मात्र उत्तर कोरियात भूकंप झाला नसून ते आण्विक चाचणी केल्याचे संकेत आहेत, असा दावा जपान व दक्षिण कोरियाने केला आहे.
दरम्यान, चीनमध्ये भूकंपाच्या घटनेवर लक्ष ठेवणा-या संस्थेनेदेखील हे आण्विक चाचणी केल्याची शंका व्यक्त केली आहे. याबरोबरच अमेरिकानेदेखील याला दुजोरा दिला आहे.
अमेरीकेनी हायड्रोजन बोंब ची चाचणी केली तेव्हा सुनामी आली लाखो लोक मारले गेले. आम्हाला महितच नाही.भारतीय पत्रकार बातमी मागील बातमी शोधत नाहीत.