लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर यांचे बॉम्बे रुग्णालयात वयाच्या ८३ व्यावर्षी निधन झाले.
मुंबई- ‘असंभव’ मालिकेतील सोपानकाकांसारख्या अनेक भूमिकांमुळे लोकप्रिय ठरलेले ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर यांचे वयाच्या ८३ व्यावर्षी निधन झाले. भालेकर यांना गेले काही दिवस फुफुस्साच्या आजाराचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल केले होते. तिथे उपचार चालू असतानाच शनिवारी सकाळी साडेतीन वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा हेमंत, पाच मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.
सुहास भालेकर यांनी आपल्या साठ वर्षाच्या दीर्घ कारकिर्दीत अनेक नाटके, चित्रपट आणि टीव्ही मालिकांतून काम केले. वडिलांचा विरोध असल्याने सुरुवातीला त्यांनी साबाजी या नावाने हौशी नाटकात कामे केली. शाहीर साबळेंच्या सहवासात आल्यावर ते सतरा वर्ष ‘शाहीर साबळे आणि पार्टी’त कामाला होते. या काळात त्यांनी अनेक वगनाट्य केली.
पुढे दाजी भाटवडेकर यांच्या संपर्कात आल्यावर ते साहित्य संघ मंदिरच्या नाटकांत चमकू लागले. विजया महेता यांच्यामुळे ते व्यावसायिक रंगभूमीवर आले. ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘अमलदार’, ‘मी मंत्री झालो’, ‘बेबंदशाही’, ‘अजब न्याय वर्तुळाचा’, ‘फुलला सुगंध मातीचा’ अशा अनेक नाटकात त्यांनी भूमिका केल्या. ‘भुजंग’, ‘गंमतजंमत’, ‘चटकचांदणी’, ‘उनाड मैना’ यासारख्या मराठी चित्रपटांबरोबर त्यांनी ‘गहराई’, ‘अर्थ’, ‘दामिनी’, ‘चायना गेट’सारख्या हिंदी चित्रपटांतूनही भूमिका केल्या. अलीकडे ‘असंभव’ मालिकेतील सोपानकाकांची भूमिका विशेष गाजली.
सोपानकाका म्हणून परिचित असलेले सुहास भालेकर यांची प्रहारमध्ये प्रसिध्द झालेली मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा
[EPSB]
साबाजी, सुहास आणि सोपानकाका!
‘असंभव’ या मालिकेत खलनायकी छटा असलेली भूमिका रंगवणा-या सोपानकाका म्हणजे सुहास भालेकर गेली साठ वर्ष रंगभूमीवर काम करताहेत. कामगारांच्या सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेला मुलगा ते एक उत्तम अभिनेता असा ‘असंभव’ प्रवास त्यांनी आपल्या अभिनयगुणांनी संभव केला. शाहीर साबळेंपासून विजया मेहतांपर्यंत आणि व्ही. शांताराम यांच्यापासून महेश भट्ट यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी काम केलं.
[/EPSB]
he was one of the Great Actor in Marathi Film Industry.
i remember his fims when i was seen in my childhood.