पहिली भारतीय महिला बँक सबलीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत असून या बँकेच्या आणखी १६ शाखा पुढील चार महिन्यात सुरु करण्यात येणार आहेत.
नवी दिल्ली – पहिली भारतीय महिला बँक सबलीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. बँक पुढील आणखी १६ शाखा चार महिन्यात सुरु करण्यात येणार आहेत.
आम्ही पुढच्या चार महिन्यात आणखी १६ शाखा खोलण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे बँकेच्या अध्यक्ष उषा अनंतसुब्रम्हण्यम यांनी सांगितले. यापैकी दोन शाखांचे उद्घाटन पुढील महिन्यातील पहिल्याच आठवड्यात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या दोन शाखा दिल्ली आणि इंदौर येथे सुरु येणार आहेत.
ग्रामीण भाग आणि बँका नसलेल्या क्षेत्रात महिला बँकेच्या शाखा खोलणे हे आमचे उद्दिष्ट आहे आणि पुढच्या आर्थिक वर्षांपर्यंत हे उद्दिष्ट २५ टक्क्यापर्यंत पूर्ण करायचे आहे.
१९ नोव्हेंबरला इंदिरा गांधी यांच्या ९६ व्या स्मृती दिना दिवशी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते या बँकेचे उद्धाटन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीही उपस्थित होत्या. या वेळी बँकेच्या संचालक मंडळाची घोषणा केली होती. यात बँकेच्या अध्यक्ष उषा अनंतसुब्रह्मण्यम यांच्यासह छवी राजावत, नूपुर मित्रा, रेणुका रामनाथ, तनया दुभाष, कल्पना सरोज, प्रिया कुमार यांची संचालकपदी निवड करण्यात आली होती.
KRUPAYA MALA YA BANKETUN LOANCHI SUVIDHA UPLABDH JALYAS MI AAPLI KHUP ABHARI HONAR TYA SATHI MALA KAY KARAVE LAGNAR HEY MALA MAZHYA MAIL ID VAR KALVNAR TAR KHUPACH BARE HOIL