सुनेच्या हत्येप्रकरणी शिक्षा झालेल्या दोन सासवांनी वयोमान विचारात घेता, शिक्षेत सवलत मिळावी, मुदतपूर्व सुटका करावी अशी मागणी पत्राद्वारे न्यायालयात केली आहे.
मुंबई- सुनेच्या हत्येप्रकरणी शिक्षा झालेल्या दोन सासवांनी वयोमान विचारात घेता, शिक्षेत सवलत मिळावी, मुदतपूर्व सुटका करावी अशी मागणी पत्राद्वारे उच्च न्यायालयात केली आहे. ८० आणि ९० हे आरोपींचे वय विचारात घेता, या दोघींच्या अर्जावर राज्य सरकारने तात्काळ विचार करून उत्तर द्यावे, असे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहे.
हौसाबाई कोळी व चंपा कांबळे (९०) यांनी लिहिलेल्या पत्रांची दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे. उच्च न्यायालयाचे न्या. अभय ओक व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. सुनेचा हुंड्यासाठी छळ करून हत्या करणा-या हौसाबाई कोळी यांनी शिक्षा म्हणून १७ वर्ष तुरुंगात घालवली आहेत.
आजारपणाचे कारण देत मुलगी व नातवासोबत आयुष्यातील शेवटचे काही दिवस घालवण्याची इच्छाही त्यांनी पत्रात नमूद केली आहे. कोल्हापूर तुरुंगाच्या वैद्यकीय अधिका-यांचे आजारपणाचे प्रमाणपत्रही त्यांनी पत्रासोबत जोडले आहे. वय लक्षात घेता हौसाबाई फार काळ जगणार नाहीत, असे वैद्यकीय अधिका-यांचेही मत आहे.
तर चंपा कांबळे यांनीही आयुष्याचा उतारकाळ मुले, नातवंडे-नातेवाईकांसोबत घालवण्याची इच्छा पत्राद्वारे न्यायालयात व्यक्त केली आहे. त्याही कोल्हापूर तुरुंगातच शिक्षा भोगत आहे. उच्च न्यायालयाच्या मोफत विधि सेवा समितीच्या वतीने अरफान सैद यांची या दोन्ही प्रकरणांत वकील म्हणून नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्र कारागृह शिक्षा पुनर्विचार नियम, १९७२ नुसार वैद्यकीय अधिकारांनी दिलेला अहवाल विचारात घेऊन वयोमान व आजारपण या मुद्दयांवर मुदतपूर्व सुटका होऊ शकतेही. या दोन्ही कैद्यांचे अर्ज राज्यपालांकडे प्रलंबित असल्याची माहिती अतिरिक्त सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया यांनी खंडपीठाला दिल्यानंतर त्यांच्या मागणीवर सरकार व संबंधितांना लवकर निर्णय घ्यावा, असे मत खंडपीठाने नोंदवले.
agodar gunha kara ,,,,,,ani ata shekshet savlat maga ..
shikshet savlat deu naka yaana ..