भोसरी येथे महापालिका रुग्णालयात गतिमंद महिलेवर रुग्णालयातील कर्मचा-यांनीच अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.
पिंपरी- देशातील वेगवेगळ्या भागात महिलांवर लैंगिक अत्याचाराचे सत्र सुरुच आहे. मुंबईतील सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच, पुण्याजवळच्या पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरी येथील महापालिकेच्या रुग्णालयात एका गतिमंद महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.
रुग्णालयातील कर्मचा-यांनीच हे दुष्कृत्य केले. प्रमोद मांडेकर आणि शैलेश दगडू जाधव अशी आरोपींची नावे असून, त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
आरोपींनी महिलेच्या गतिमंदतेचा फायदा उचलत तिला, रुग्णालयातील लिफ्टमध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही महिला भोसरी येथील एका पुनर्वसन केंद्रात रहात होती. तिला उपचारासाठी महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याच्या एकदिवस आधी या महिलेवर बलात्कार करण्यात आला. पुनर्वसन केंद्रातील कर्मचारी या महिलेला भेटण्यासाठी आले असता, तिने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. या कर्मचा-यांनी ताबडतोब पिंपरी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला व शनिवारी रात्री दोघा आरोपींना अटक केली.
Very Hard punishment need to given to these shameless peoples so that anyone ahead trying to do this event will be threatened to see the punishment given.
The people doing this bad activity may be under impression that nothing will happen to them … their impression need to be make wrong by giving very hard punishment which is different !!!
Chnage in law is necessary !!!