बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या कथित प्रेमसंबंधाबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये नेहमीच चर्चा असते. आता दीपिकाने या विषयावर प्रसारमाध्यमांकडून विचारल्या जाणा-या प्रश्नांना उत्तर देणेच बंद केले आहे.

‘फाईडिंग फॅनी’ या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेमध्ये दीपिकाला रणवीरसंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर तिने उत्तर देण्याचे टाळले.
झोया अख्तरच्या आगामी ‘केमियो’ चित्रपटात तुझ्याबरोबर रणवीर मुख्य भूमिकेत आहे ? असा प्रश्न पत्रकारांनी दीपिकाला विचारला त्यावर दीपिकाने मी ‘केमियो’मध्ये नाही त्यामुळे या कार्यक्रमामध्ये हा प्रश्न गैरलागू नाही का ? असा प्रतिप्रश्न करत दीपिकाने उत्तर देण्याचे टाळले.
‘केमियो’साठी दीपिकाने रणवीरची शिफारस केल्याची चर्चा आहे. ‘फाईडिंग फॅनी’मध्ये रणवीर दीपिकाच्या मृत पतीची भूमिका करत आहे. एका मुलाखतीत रणवीरने दीपिका माझ्यासाठी विशेष असल्याचेही म्हटले होते. मात्र दीपिकाने आतापर्यंत कधीही या प्रेमसंबंधाचा जाहीर स्वीकार केलेला नाही.
हि सोन्दर्यवति आणखीन कुणा कुणाला आपल्या सुन्देर्तेच्या मायाजालात फसवत राहणार आहे ,????