पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील ९१ टक्के मंत्री करोडपती आहेत.तर तीस टक्के मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत.
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील ४४ मंत्री करोडपती आहेत. तर तीस टक्के मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ने केलेल्या अभ्यासादरम्यान हे आढळून आले आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांपैकी ९१ टक्के मंत्री हे करोडपती आहेत. अर्थ मंत्री अरुण जेटली यांच्याकडे सर्वाधिक ११३ कोटींची मालमत्ता आहे. तर त्यांच्यापाठोपाठ हरसिम्रत कौर बादल, गोपीनाथ मुंडे, मनेका गांधी आणि पियुष गोयल यांचा नंबर लागतो. मनसुखभाई वसावा यांच्याकडे सर्वात कमी ६५ लाख रुपयांची संपत्ती आहे. तर थावरचंद गेहलोत आणि सुदर्शन भगत यांच्यांकडे अनुक्रमी ८६ लाख आणि ९० लाख रुपयांची मालमत्ता आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात करोडपती मंत्र्यांसोबतच तीस टक्के मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. मंत्रिमंडळातील ४४ मंत्र्यांपैकी १३ मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्यातील आठ मंत्र्यांच्याविरोधात खूनाचा प्रयत्न, अपहरण, निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली खटला अनिर्णीत आहे तर ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात अपहरणांसंदर्भातील खटला प्रलंबित आहे.
हाहाह्ह जसे कॉंग्रेस वाले धुतल्या तांदळा सरके आहेत…..!!!