जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या तालुका प्रमुखांसह उपविभाग प्रमुखांनी राजीनामे दिले असून दापोलीचे शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
दापोली- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या तालुका प्रमुखांसह उपविभाग प्रमुखांनी राजीनामे दिले असून दापोली-मंडणगड-खेड मतदार संघातील शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात सध्या शिवसेनेत नाराजीचे सूर पाहायला मिळत आहे. संगमेश्वर तालुक्यातील नाराजीनंतर या नाराजीचे लोण आता दापोली तालुक्यातही पोहोचले आहेत.
पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या कार्यपद्धतीवर सूर्यकांत दळवी नाराज असून आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
त्यानंतर दळवींच्या समर्थनासाठी शिवसेनेच्या तालुका प्रमुखांसह उपविभाग प्रमुखांनी राजीनामे दिले. तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार निवड करताना तालुकाप्रमुख आणि उपतालुकाप्रमुख यांची कोंडी करण्यात आल्याचा आरोप पदाधिका-यांनी या मेळाव्यात केला. तालुकाप्रमुखांनी दिलेल्या यादीत अनेक बदल करण्यात आले. त्यामुळे दापोली तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
जा भाजप मध्ये… तुझा पण भूजबल होणार…