दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासोबत थेट चर्चा करणार असल्याचा शब्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दिला.
वॉशिंग्टन- पाकिस्तानमधून गेल्या अनेक दिवसांपासून भारतावर होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासोबत थेट चर्चा करणार असल्याचा शब्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दिला. ओबामा व मनमोहन सिंग यांच्यात शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये या मुद्दयावरील कृतीवरूनच बैठकीत संवाद होईल असे ठामपणे सांगितले.
दोन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी केलेला हल्ल्यासंदर्भात ओबामा यांच्याशी चर्चा करताना पतंप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या दहशतवादी हल्ल्याबात चिंता व्यक्त केली.
दहशतवादामुळे भारताला अनेक संकटांचा सामना करावा लागत असून, त्याचा भारताच्या सुरक्षेवर परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे भारत-पाक यांच्या चर्चेवरही परिणाम होत असल्याचे त्यांनी ओबामा यांच्या निदर्शनास आणून दिले. या वेळी ओबामा यांनी हे आश्वासन दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
सांबा येथे पोलिस ठाणे व लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात ओबामा यांनी निषेध व्यक्त केला. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासोबत २३ ऑक्टोबर रोजी होणा-या बैठकीत या विषयावर स्पष्टपणे चर्चा करू असे आश्वासन पंतप्रधानांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
मनमोहन सिंग व ओबामा यांच्यामध्ये दहशतवादावर जवळपास तीन तास चर्चा झाली. यामध्ये भारतातील दहशतवादासह पाकिस्तानमधनू अफगाणिस्तानमध्ये होत असलेल्या दहशतवादावरचही चर्चा झाली. या वेळी पाकिस्तानमधील पंजाब सरकारकडून ‘जमात-उद-दवा’ या दहशतवादी संघटनेमार्फत मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्यामुळे लष्कर-ए-तोयबामार्फत भारतात होणा-या हल्ल्यासंदर्भात मनमोहन सिंग यांनी ओबामा यांना सांगितल्यानंतर ओबामा यांनी या मुद्दयावर तीव्र चिंता व्यक्त केली. पाकिस्तानमधून मोठया प्रमाणात दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दहशतवादाविरोधात एकमेकांमधील सहकार्य वाढवण्याची गरज आहे यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.
अफगाणिस्तानमध्ये ही तालिबान्यांकडून होत असलेल्या दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानमधून खतपाणी मिळत असल्याचेही पंतप्रधानांनी ओबामांच्या लक्षात आणून दिले. यावर ओबामा यांनी पाकिस्तानने भारताऐवजी ऊर्जा आणि व्यापार यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. तसेच भारताने अफगाणिस्तानमध्ये केलेले कार्य आणि त्यांना केलेले सहकार्य याबद्दल ओबामा यंनी भारताची प्रशंसा केली.
अतिशय योग्य शब्दात सखोल वृतांत .खुपच समाधान देणारी बातमी .ओबामान्नी प्रामाणिक पणे आपली भूमिका पर पाडावी ही भारतीयांची अपेक्षा आहे .