अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा भारत दौरा दोन्ही देशांसाठी फलदायी ठरेल, अशी आशा अमेरिकेने व्यक्त केली आहे.
वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा भारत दौरा दोन्ही देशांसाठी फलदायी ठरेल, अशी आशा अमेरिकेने व्यक्त केली आहे.
भारत आणि अमेरिकेतील संबंध अधिक दृढ करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर येथील पत्रकारांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्रीय उप सुरक्षा सल्लागार बेन -होडस म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील व्यक्तिगत पातळीवर संबंध दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरतील.
ऊर्जा धोरण आणि वातावरण बदल या विषयावर प्राधान्यतत्त्वावर चर्चा होणार आहे. पॅरिसच्या संयुक्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेत वातावरण बदलांवर चर्चा होईल. तसेच अर्थव्यवस्था, संरक्षण, विभागीय आणि जागतिक पातळीवरील मुद्दय़ावर चर्चा होणार आहे, असेही ते म्हणाले.
तथास्तु