गेल्या अनेक दिवसांपासून गाण्यांमुळे वेड लावणारा ‘सैराट’ हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला.
मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून गाण्यांमुळे वेड लावणारा ‘सैराट’ हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसात ७.३५ कोटींची कमाई केली आहे.
प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद पाहता हा चित्रपट कमाईच्या बाबतीत ‘नटसम्राट’ला मागे टाकण्याची शक्यता आहे. नटसम्राटने तीन दिवसांत तब्बल १० कोटींचा गल्ला जमवला होता.
सैराट’ने पहिल्याच दिवशी ३.५५ कोटी आणि दुस-या दिवशी ३.८० कोटींची कमाई केली. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट मोठी झेप घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अजय-अतुल यांचे दमदार संगीत, नागराज मंजुळेचे दिग्दर्शन आणि रिंकू-परश्या जोडीची कमाल केमिस्ट्री यामुळे पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली आहे.
उत्तम चित्रपट