रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरे या तरुणीला अखेर कृत्रिम हात मिळाले. या कृत्रिम हातांनी तिने गुरुवारी पहिल्यांदा स्वत:चे नाव लिहिले, त्या वेळी तिचे डोळे भरून आले.
मुंबई – रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरे या तरुणीला अखेर कृत्रिम हात मिळाले. या कृत्रिम हातांनी तिने गुरुवारी पहिल्यांदा स्वत:चे नाव लिहिले, त्या वेळी तिचे डोळे भरून आले. तिला भेटायला येणा-या सर्वाशी तिने हसत हसत हात मिळवला.
घाटकोपर रेल्वे स्थानकात लोकल पकडताना झालेल्या अपघातात मोनिका गंभीर जखमी झाली होती. या अपघातात तिला दोन्ही हात गमावावे लागले. ११ जानेवारी रोजी हा अपघात घडला होता. मोनिकाला कृत्रिम हात बसवण्यासाठी येणा-या खर्चाचा भार उचलण्याकरता अनेकांनी मदतीचा हात पुढे केला.
गुरुवारी मोनिकाला कृत्रिम हात बसवण्यात आले. या हातांचे प्रात्यक्षिक झाले. कृत्रिम हातांनी लिहिता आणि अन्य कामे करता येणार असल्याने मोनिकाच्या चेह-यावर वेगळाचा आनंद पाहायला मिळाला. केईएम रुग्णालयात मोनिका उपचार घेत आहे.
या कृत्रिम हातांच्या मदतीने मोनिका पुढच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करणार आहे. मात्र पावसाळ्यात मोनिकाला हे हात वापरता येणार नाहीत. मोनिकाला हात मिळाल्याने तिच्या आई-वडिलांच्या चेह-यावरही हास्य पाहायला मिळाले.
God ब्लेस you my सिस्टर. !!