माळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये.
माळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये. नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये, माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये. जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी.
जप करण्याची पद्धत :
शास्त्रानिहाय गोमुखी वापरून जप तसेच बोटांच्या सहाय्याने जप, गोमुखीने केलेला जप : उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ठ बाधांपासून मुक्ती मिळते. बोटांच्या सहाय्याने केलेला जप : अंगठयाच्या सहाय्याने जप केल्याने मोक्ष प्राप्ती, तर्जनेनेजप- शत्रुनाश, मध्यमेनेजप-धनप्राप्ती, अनामिकेनेजप- शांतीप्राप्ती, करांगुलीनेजप- सुंदरताप्राप्ती.
जपाची सुरुवात मेरू मण्यापासून करावी. मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये, जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरूमण्याकडे यावे.
जपाची शास्त्रीय पद्धत :
मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठयाने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे या प्रक्रियेमुळे विद्युतशक्तीची निर्मिती होते. अंगुष्ठमध्यमायोगात्सर्व सिद्धी प्रदासने। (मंत्रमहार्णव) अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्वसिद्धी प्राप्त होतात.
जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता ताम्हणात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी. तसेच खुंटीवर किंवा उघडया जागेत सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या, चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी. ही माळ पूर्वी कोणीतरी वापरली नसावी.
जपमाळेतील १०८ मणी विद्युत शास्त्रात १०८ या अंकाचा खुलासा मिळतो. १०८ हा एक स्थिरांक उल्ल२३ंल्ल३ आहे. द्रावणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युतशक्ती उपयोगात येते, त्या विद्युतशक्तीचे हे माप आहे. या मापाला फॅरडे म्हणतात.
फॅरडे : /Rcharge carried by one gram equivalent of an ion, i.e. charge required to pass to liberate १०७.८८= (१०८). gm of silver is called as ONE FARADAY
म्हणजेच १०८ हा शक्तीचा विद्युतभार आहे. चांदी, तांबे व सोने यांचा मंत्रशास्त्राशी असलेला संबंध आपण पाहिला. यावरूनच मंत्रावर्तने ७ शक्ती (मंत्राच्या आवर्तनाशी शक्तीचा प्रत्यक्ष संबंध असतो) मंत्रावर्तन स्थिरांक = उत्पादित शक्ती. या उत्पादित शक्तीला दिशा म्हणजेच संकल्पाची जोड दिली की ती शक्ती प्रवाहित होऊन तिचे कार्य घडून येते.
शास्त्रशुद्धपणे २७, ५४ किंवा १०८ मणी माळेत असावेत. हे अंक शास्त्रातील ९ या अंकाच्या महतीद्वारे ठरविण्यात आलेले आहेत. वरील संकेत ९ ही अंकाची बेरीज जसे ५ + ४ = ९, २ + ७ = ९, १ + ० + ८ = ९
अत्यंत सुंदर माहितीबद्दल धन्यवाद.