इराकमधून भारतात सुखरूप परतलेल्या ४६ नर्सेसना दुबई स्थित एका भारतीय उद्योगपतीने नोकरीचा प्रस्ताव दिला आहे.
दुबई- इराकमधून भारतात सुखरूप परतलेल्या ४६ नर्सेसना दुबई स्थित एका भारतीय उद्योगपतीने नोकरीचा प्रस्ताव दिला आहे.
एनएमसी हेल्थकेअर ग्रुपचे डॉ. बी. आर. शेट्टी यांनी हा प्रस्ताव नर्सेससमोर ठेवला असून नर्सेसना यूएईमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे उद्योगसमूहाच्या अधिका-याने सांगितले.
दुबई, इजिप्त आणि भारतात शेट्टी यांच्या मालकीची रुग्णालये असून नर्सेसना नोकरी देण्याचा प्रस्ताव केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्याकडे पाठवला असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
इराकमध्ये सुरू असलेल्या यादवीच्या पार्श्वभूमीवर ४६ नर्सेससह १३७ भारतीय नागरिक भारतात परतले होते. तसेच इराकमध्ये पुन्हा न जाण्याचा निर्धारही या नर्सेसनी केला होता.
छान ….!!!