मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर (ईव्हीएम) निवडणूक चिन्हांबरोबरच उमेदवारांची छायाचित्रेदेखील दिसणार आहेत.
इम्फाळ- मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर (ईव्हीएम) निवडणूक चिन्हांबरोबरच उमेदवारांची छायाचित्रेदेखील दिसणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. के. देवांग यांनी याची घोषणा केली.
देशात पहिल्यांदाच अशा प्रकरचा प्रयोग करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मणिपूर विधानसभेची निवडणूक ४ मार्च आणि ८ मार्च रोजी दोन टप्प्यांमध्ये होणार होणार आहे.
४ मार्चला पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यातील ३८ जागांसाठी तर ८ मार्चला दहा जिल्ह्यातील २२ जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर बुधवारपासूनच राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
काही केले तरी मशीन मध्ये घोटाळा असेल तर त्याचा काय उपयोग?