गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थनगर हौसिंग सोसायटीच्या पत्राचाळीच्या पुनर्विकासाबाबत योग्य पावले उचलली न गेल्याने म्हाडा आणि विकासकांविरोधात रहिवाशांनी पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उचलले आहे.
मुंबई- गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थनगर हौसिंग सोसायटीच्या पत्राचाळीच्या पुनर्विकासाबाबत योग्य पावले उचलली न गेल्याने म्हाडा आणि विकासकांविरोधात रहिवाशांनी पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उचलले आहे.
८ मार्चला दुपारी सिद्धार्थनगर पत्राचाळ येथील रहिवासी एकत्र जमणार असून गुरुआशिष डेव्हलपर्स, एचडीआयएल आणि म्हाडाविरोधात आंदोलन करून पुनर्विकासाची प्रक्रिया जलदगतीने राबवण्याची मागणी करणार आहेत.
सिद्धार्थनगर येथील पत्रा चाळ ही सर्वात जुनी म्हाडा वसाहत आहे. या पत्रा चाळीत ६७२ रहिवासी राहत होते. पुनर्विकासासाठी म्हाडा आणि विकासकांवर विश्वास ठेवून या सर्व रहिवाशांनी त्यांची घरे २००८ साली रिकामी केली. या रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले.
म्हाडा, पत्रा चाळ आणि विकासकांत पुनर्विकासासाठी त्रिपक्षीय करार झाला. त्यानुसार रहिवाशांना ६५० चौरस फुटांची घरे, सोसायटीला २५ कोटींचा निधी आणि संक्रमण काळात रहिवाशांना १८ ते २० हजार रुपये दरमहा भाडे देण्याचे ठरले होते.
यासाठी कालावधीही निश्चित करण्यात आला होता. २ ते ३ वर्षात काम पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु साडेसहा वर्षे उलटूनही पुनर्विकास प्रक्रियेचे केवळ ५० टक्के काम झाले आहे.
हा ५००० कोटि रुपयांचे घोटाला आहे कागद पत्र उपलब्ध आहे