संपूर्ण मुंबईला हादरवून टाकणा-या १९९३ साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला बॉलीवूड अभिनेता सलमान खानने पाठिंबा दर्शवला आहे.
मुंबई – संपूर्ण मुंबईला हादरवून टाकणा-या १९९३ साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला बॉलीवूड अभिनेता सलमान खानने पाठिंबा दर्शवला आहे. याकूबला शिक्षा देऊ नये तर त्याचा भाऊ टायगर मेमनला फाशी देण्यात यावी अशी मागणी सलमानने केली आहे.
बॉम्बस्फोट प्रकरणी याकूबला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याला ३० जुलैला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे.
टायगरला फाशी द्या त्याच्या भावाला नाही असे सलमानने ट्विटरवर म्हटले आहे. रात्रभरात त्याने मेमनच्या फाशीच्या शिक्षेबाबत १४ ट्विट केले आहेत. एका निरपराध्याला फाशी म्हणजे मानवतेची हत्या असल्याचे सांगत सलमानने याकूबची पाठराखण केली आहे.
तसेच जर पाकिस्तानात टायगर मेमन आहे तर त्याला भारतात पाठवून द्यावे असेही सलमानने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सांगितले आहे.
[poll id=”1090″]
१२ मार्च १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात तब्बल २५७ जणांचा बळी तर ७०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या स्फोटाप्रकरणी न्यायालयाने मेमनला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेविरोधात त्याने केलेल्या याचिकाही उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात फेटाळल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे त्याने दयेचा अर्ज केला आहे. यापूर्वी राष्ट्रपतींनी त्याचा दयेचा अर्ज फेटाळून लावला होता.
काय म्हणाला सलमान ट्विटरवर
Kaun sa tiger kaisa tiger kidhar hai tiger. Samaj raha hai tiger. Kay soch k nam diya tha aur kya maina nikal liya uus ka.
— Salman Khan (@BeingSalmanKhan)
July 25, 2015
Brother is being hanged for tiger. Aarrre Whr is tiger?
— Salman Khan (@BeingSalmanKhan) July 25, 2015
Tiger ki hi to kami hai India mein. Tiger ko Lao. Hum toh upne family par mar jaaaeen. Tiger tumhaara bhai kuch Dino mein tumhare liyeh
— Salman Khan (@BeingSalmanKhan)
July 25, 2015
Phasisi k phande pe chardne walla hai . Koi statement. Koi address. Kuch toh bolo k tum teh. Wah bhai ho toh aisa. Matlab. Ya khoob menan.
— Salman Khan (@BeingSalmanKhan) July 25, 2015
Kaun sa tiger kaisa tiger kidhar hai tiger. Samaj raha hai tiger. Kay soch k nam diya tha aur kya maina nikal liya uus ka.
— Salman Khan (@BeingSalmanKhan)
July 25, 2015
1 innocent man killed is killing the humanity
— Salman Khan (@BeingSalmanKhan) July 25, 2015
Yaqub menon pe pad k coment karna
— Salman Khan (@BeingSalmanKhan)
July 25, 2015
Hut
— Salman Khan (@BeingSalmanKhan) July 25, 2015
Get tiger
— Salman Khan (@BeingSalmanKhan)
July 25, 2015
Get tiger hang him. Parade him not his brother
— Salman Khan (@BeingSalmanKhan) July 25, 2015
Kidhar chupa hai tiger? Hey koi tiger nahi hai hai hai billi aur hum ek billi ko nahi pakad sakteh.
— Salman Khan (@BeingSalmanKhan)
July 25, 2015
Sharif Saab ek darkhaust hai k agar yeh aap k mulkh mein hai toh plz iktila kar deejiyeh.
— Salman Khan (@BeingSalmanKhan) July 25, 2015
been wanting to tweet Tis fr 3 days n was afraid to do so but it involves a man’s n family. Don’t hang brother hang tha lomdi who ran away
— Salman Khan (@BeingSalmanKhan)
July 25, 2015
N no 1 ever Address him as tiger ever . Does not deserve that at all. Hang that………….. fill in th blanks
— Salman Khan (@BeingSalmanKhan) July 25, 2015
सलमान खानने जी प्रतिक्रिया दिली आहे तशीच प्रतिक्रिया आय आय एम चा ओवैसी , अबू आझमी आणि अगदी माजी मुख्य सरकारी अधियोक्ता माजिद मेमन या सर्वांनी दिली आहे. माननीय श्री. उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे कि या बाबतीत सलमान वर मा. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई होऊ शकते. माझे असे नम्र निवेदन आहे कि उपरोल्लेखित सर्व जण तसेच यापुढे जे जे म्हणतील कि याकुब मेमन निर्दोष आहे त्यामुळे त्याला फाशी देऊ नये त्या सर्वांवर मा. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई झाली पाहिजे याबद्दल मा. श्री. निकम यांनी पाठपुरावा मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये करावा जेणेकरून अशा सवंग, विचारशून्य आणि राष्ट्रप्रेम नसणाऱ्या लोकांना जबरदस्त धडा मिळेल.