‘एमएमआरडीए’च्या नावाने ‘मुंबई रेल कॉर्पोरेशन’मध्ये तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी भरती सुरू असल्याच्या खोट्या जाहिराती प्रसिद्ध करून पैसे उकळण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
मुंबई- ‘एमएमआरडीए’च्या नावाने ‘मुंबई रेल कॉर्पोरेशन’मध्ये तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी भरती सुरू असल्याच्या खोट्या जाहिराती प्रसिद्ध करून पैसे उकळण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अशा जाहिरातींना प्रतिसाद देणा-यांना नियुक्तीपत्रही मिळाले असून, त्यात अनामत रक्कम भरण्याबाबतची सूचनाही देण्यात आली आहे. दरम्यान, अशा जाहिराती प्रसिद्ध करणा-यांवर कारवाई करण्यासाठी प्राधिकरणाने प्रक्रिया सुरू केली आहे. या बनावट जाहिरातींना फसू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
बनावट नियुक्तीपत्रामध्ये प्राधिकरणाचे संकेतस्थळ नमूद करण्यात आले आहे. मात्र हे संकेतस्थळही बनावट आहे. जाहिरातीत व नियुक्तीपत्रावर प्राधिकरणाचे नाव वापरले असल्याने अनेकांनी भरतीसाठी अर्ज केले. त्यानंतर एमएमआरडीएच्या नावानेच त्यांना नियुक्तीपत्रही पाठवण्यात आले.
त्यात काही अनामत रक्कमही भरण्याबाबतची सूचना करण्यात आली होती. पत्ता, लोगो एमएमआरडीएचाच वापरण्यात आला असल्याने काही जण एमएमआरडीएच्या कार्यालयात चौकशीसाठी गेले असता, हे बनावट भरती प्रकरण उघडकीस आले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये कुठल्याही पदांसाठीच्या नेमणुकीकरता शुल्क किंवा अनामत रक्कम आकारली जात नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन प्राधिकरणाचे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी केले आहे.
अश्या खोट्या जाहिराती देवून तरुण वर्गांची दिशाभूल करणार्यांना नागडे करून गाडवावर बसवून ,तोंडाला
काळे फासून ,भर बाजारांत त्यांची मिरवणूक काढायलाच हवी .