बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार असल्याच्या चर्चेला शाहिदने अखेर पूर्णविराम दिला आहे.
मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार असल्याच्या चर्चेला शाहिदने अखेर पूर्णविराम दिला आहे. ‘होय, मी पिता होणार आहे,’ असे सांगून त्याने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
‘उडता पंजाब’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. यावेळी शाहिदने ही गोड बातमी दिली.
शाहिदची पत्नी मीरा राजपूतने नुकत्याच झालेल्या ‘लॅक्मे फॅशन विक’मध्ये रॅम्पवॉक केले. यावेळी मसाबा गुप्ताने डिझाईन केलेला अटायर मीराने परिधान केला होता. मसाबाने रॅम्पवरील मीराचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर केले. त्यानंतर शाहिद आणि मीराच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू झाली.
शाहिदला प्रसारमाध्यमांनी ‘तू वडिल होण्यासाठी तयार आहेस का?’ असा प्रश्न विचारला. यावर शाहिदने ‘होय, मी पिता होणार आहे?’ असे स्पष्ट केले.
‘उडता पंजाब’ या चित्रपटात शाहिद रॉक स्टारच्या भूमिकेत आहे. त्याच्याबरोबर अभिनेत्री करिना कपूर आणि आलिया भट्टदेखील प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट येत्या १७ जूनला प्रदर्शित होत आहे.
मोट्टा वाघ मारलास रे बाबा तू ,! भारत भूषण साठी शिफारस करतो मी तुझ्यासाठी ,!