रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडनेही (बीएसएनएल) कंबर कसली आहे.
नवी दिल्ली- रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडनेही (बीएसएनएल) कंबर कसली आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल, एअरसेल आणि आयडिया कंपन्यानंतर आता बीएसएनएलनेही आपल्या ग्राहकांना मोफत कॉलिंग आणि फ्री इंटरनेट डेटा देण्याची ऑफर दिली आहे.
यासाठी बीएसएनएलने ग्राहकांसाठी ९९ आणि ३३९ रुपयांची ऑफर देऊ केली आहे. बीएसएनएलने ही योजना रिलायन्स जिओ आणि इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आणल्याचे बोलले जाते. ही ऑफर फक्त प्रीपेड ग्राहकांसाठीच असेल.
९९ रुपयांच्या पॅकमध्ये ग्राहकांना बीएसएनएल ते बीएसएनएल अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविध मिळेल. त्या पॅकेजबरोबर ३०० एमबी डेटाही मिळेल. या पॅकची व्हॅलिडिटी २८ दिवस इतकी असेल.
ही ऑफर पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, आसाम, गुजरात, आसाम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि राजस्थानच्या ग्राहकांना मिळेल. इतर सर्कलमध्ये या पॅकची किमत ११९ रुपए ते १४९ रुपये इतकी असेल.
९९ रुपयांच्या पॅकशिवाय बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक पॅक लाँच केला आहे. या पॅकची किमत ३३९ रुपये आहे. याची वैधता २८ दिवस इतकी आहे. या पॅक अंतर्गत कोणत्याही नेटवर्कसाठी अमर्यादित लोकल आणि एसटीडी असेल. त्याचबरोबर १ जीबी डेटाही देण्यात येणार आहे.
परंतु, मिळणारा डेटा पॅक हा ४ जी, ३ जी की २ जी असेल हे बीएसएनएलच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेले नाही. बीएसएनएलने यापूर्वीच १०९९ मध्ये अमर्यादित ३ जी सेवा दिली आहे. याची वैधता ३० दिवस इतकी आहे. रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल, व्होडाफोन, आयडिया आणि रिलायन्स कम्युनिकेशनने नुकताच अमर्यादित कॉलिंगचा प्लॅन सादर केला होता.
एअरटेल आणि आयडियाने मोफत कॉलिंग बरोबरच इंटरनेट डेटाची सुविधा देणारे एकाच किमतीचे दोन प्लॅन दिले होते. रिलायन्स जिओबरोबर टक्कर देण्यासाठी या दोन्ही कंपन्यांनी २८ दिवसांची वैधतेबरोबर १५० आणि ३५० रूपयांचे प्लॅन सादर केले होते.
त्याचबरोबर व्होडाफोनने १४४ आणि ३४४ रूपयांचे दोन पॅक लाँच केले होते. १४४ रुपयांमध्ये एकीकडे अमर्यादित कॉलिंग आणि ५० एमबी डेटा मिळेल तर ३४४ रूपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि ३०० एमबी डेटा देण्यात येत आहे.
कर्शी योजने च्या ग्रहाकास अमर्यादित योजनेत येन्या साठि कोनता रिच्यार्ज मारावा हे कळवा १४१ चा आम्ही रिचार्ज मारतो