दसरा मेळाव्यात ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुधवारी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजक दिवाकर बोरकर यांच्याविरोधात हा गुन्हा केला आहे.
मुंबई- दसरा मेळाव्यात ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुधवारी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजक दिवाकर बोरकर यांच्याविरोधात हा गुन्हा केला आहे.
शिवाजी पार्क हा शांतता क्षेत्रात येतो. त्यामुळे तेथे ५० डेसिबल ध्वनिमर्यादा आहे. मात्र मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासणीत यंदाच्या दस-या मेळाव्यात आवाजाने ९३.८ डेसिबलची पातळी गाठली, अशी माहिती उपायुक्त (परिमंडळ-५) धनंजय कुलकर्णी यांनी दिली..
पोलिसांनी पाठवलेल्या ‘कारणे दाखवा’ नोटिशीला शिवसेनेने उत्तर न दिल्याने पर्यावरण संरक्षक कायदा १५(१) व महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. गेल्या वर्षी दसरा मेळाव्यातही आवाजाची पातळी ओलांडली होती. यंदाही आवाजाची पातळी ओलांडल्याने शिवसेनेवर कडक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Kayda Sarwana Saman Asu Dya..