बॉलीवूड अभिनेता विवेक ऑबेरॉय हा आगामी ‘बँक चोर’ या चित्रपटात सीबीआय अधिका-यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
मुंबई – बॉलीवूड अभिनेता विवेक ऑबेरॉय हा आगामी ‘बँक चोर’ या चित्रपटात सीबीआय अधिका-यांच्या भूमिकेत दिसणार आहे. यश राज फिल्मचा हा चित्रपट आहे. साथिया या चित्रपटानंतर तब्बल १२ वर्षांनी तो यश राज फिल्म्सच्या चित्रपटात काम करणार आहे.
तर रितेश देशमुख बँकेतील चोरांच्या टोळीचा प्रमुखाच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी ग्रँड मस्तीमध्ये या दोघांनीही काम केले होते. मात्र या चित्रपटात दोघांचीही वेगळी भूमिका पाहायला मिळणार आहे.
मेरे डॅड की मारुती या चित्रपटात काम केलेली रीहा चक्रवर्ती या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. बम्पी हे याचित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर आशिष पाटील हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
वेल डन Vivek !