भारतीय चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रिय ठरलेला बॉलीवूडचा हिट चित्रपट शोले तब्बल ४० वर्षांनंतर शुक्रवारी अखेर पाकिस्तानात प्रदर्शित झाला.
इस्लामाबाद – भारतीय चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रिय ठरलेला बॉलीवूडचा हिट चित्रपट शोले तब्बल ४० वर्षांनंतर शुक्रवारी अखेर पाकिस्तानात प्रदर्शित झाला.
१९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. या चित्रपटातील अनेक संवादही चाहत्यांच्या तोंडी आहेत. अजूनही टिव्हीवर हा चित्रपट लागल्यास प्रेक्षक तितक्याच उत्साहाने या चित्रपटाची मजा घेतात.
मंद्विदवाला एन्टरटेनमेंटचे मालक नदीम मंद्विदवाला यांनी शुक्रवारी हा चित्रपट संपूर्ण पाकिस्तानात प्रदर्शित केला. कराची मध्ये या चित्रपटाचा ग्रॅँड प्रिमियरही ठेवण्यात आला होता. यावेळी अनेक कलाकार मंडळीही उपस्थित होती.
१९७५ मध्ये रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मेगास्टार अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने अनेक विक्रम गाठले.
वन ऑफ द बेस्ट फिल्म इन बॉलीवूड history ,!