महिला छायाचित्रकारावर झालेल्या बलात्काराप्रकरणी अटक केलेला पहिला आरोपी चाँद बाबू सत्तार शेख उर्फ मोहम्मद अब्दुलची पोलिस कोठडी मागताना रिमांड अर्जात त्याचे वय १९ नमूद केले आहे.
मुंबई- महिला छायाचित्रकारावर झालेल्या बलात्काराप्रकरणी अटक केलेला पहिला आरोपी चाँद बाबू सत्तार शेख उर्फ मोहम्मद अब्दुलची पोलिस कोठडी मागताना रिमांड अर्जात त्याचे वय १९ नमूद केले आहे. मात्र त्याची आजी सरनाबाई यांनी तो अल्पवयीन असल्याचा दावा पत्रकारांशी बोलताना केला.
चाँदला अटक केल्यानंतर त्याने पोलिसांना दिलेल्या प्रमाणपत्रात २६ फेब्रुवारी १९९७ ही तारीख नमूद केली. कुटुंबाने त्याला वाचवण्यासाठी हा प्रयत्न केला आहे, असे मत पोलिसांनी व्यक्त केले.
‘चाँद हा चांगला मुलगा असून, तो वाईट गोष्ट करणारी नाही. तो अल्पवयीन असल्याची कागदपत्रे माझ्याकडे असून ती मी न्यायालयाला दाखवेन, असे सरनाबाई यांनी सांगितले. तो घरातून गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता बाहेर पडला. रात्री आठ वाजता तो पुन्हा परतला, मात्र तो तापाने थरथरत होता, असे त्या म्हणाल्या.
बलात्काराच्या गुन्ह्यात चाँदला कमीतकमी सात वर्षाचा तुरुंगवास किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. शिक्षा कमी होण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी प्रमाणपत्रात खाडाखोड केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. चाँद हा भुरटा चोर असून त्याला अमली पदार्थ, मद्याचे व्यसन आहे, असे त्याच्या शेजा-यांनी सांगितले.
[poll id=”375″]
Our Police must be made more accountable. In Railway station POLICE are taking & standing only near food stalls to have free tea & food. The Hawkers on railway platforms are all supported by Railway police.