काही वर्षांपूर्वी अभिनेता रणदीप हुड्डा अभिनयापेक्षा त्याच्या प्रेम प्रकरणांसाठी अधिक चर्चेत असायचा.
काही वर्षांपूर्वी अभिनेता रणदीप हुड्डा अभिनयापेक्षा त्याच्या प्रेम प्रकरणांसाठी अधिक चर्चेत असायचा. मात्र मागच्या दोनवर्षांमध्ये त्याने स्वत:ची ही ओळख पुसली आहे. रणदीपने आज बॉलिवूडमध्ये त्याचे अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवून दाखवले आहे.
हायवेमधील अभिनयाने तर, रणदीपला वेगळी ओळख मिळवून दिली. सलमान खानच्या किकमध्ये रणदीपने रंगवलेला पोलिस अधिकारीही लक्षवेधी ठरला आहे. रणदीपने आज करीयरमध्ये जी उंची गाठली आहे त्याचे श्रेय तो सुष्मिता सेनबरोबर झालेल्या ब्रेकअपला देतो.
सुष्मिता बरोबर माझे प्रेमसंबंध संपले ती माझ्या आयुष्यात झालेली सर्वात चांगली गोष्ट होती. या ब्रेकअपमुळे मला माझ्या करीयरकडे लक्ष देता आले असे रणदीप म्हणतो. २००६ ते २००८ अशी दोन वर्ष रणदीप आणि सुष्मिताचे प्रेम प्रकरण सुरु होते. करमा और होलीच्या सेटवर दोघांची ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.
सुष्मिता बरोबर ब्रेकअप झाल्यानंतर रणदीप अभिनेत्री नीतू चंद्राकडे आकर्षित झाला. तीनवर्ष दोघांचे प्रेम प्रकरण सुरु होते. अखेर २०१३ मध्ये दोघांनी या प्रेमसंबंधांना विराम देण्याचा निर्णय घेतला.
साला हिला सोड तिला धर ! मजा आहे तुम्हा स्टार लोकांची ,आम्हालाच कुणी भेटत नाही ,!!!