नवी मुंबई येथील कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटिस बजावली आहे.
मुंबई – नवी मुंबई येथील कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटिस बजावली आहे. ही नोटिस मिळाली असल्याचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. या नोटिशीला बुधवारी राष्ट्रवादीतर्फे उत्तर दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शरद पवार यांच्या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने अर्थ लावला गेला. त्याचा विपर्यास केला गेला. बोगस मतदानासाठी पवारांनी कधीही प्रोत्साहन दिले नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसने याआधीही स्पष्ट केले आहे. शिवाय ज्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते, तो कोणताही राजकीय कार्यक्रम किंवा प्रचारसभा नव्हती, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण मागवले आहे. त्याबाबतची नोटिस प्राप्त झाली असून, राष्ट्रवादीतर्फे या नोटिशीला उत्तर दिले जाणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.
he pawar sahebanche adhikrut statement navte te faqt tyanchya karykartyansathi hote.