मुंबई महापालिकेची कार्यालये भ्रष्टाचारमुक्त करण्याची शपथ महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त तसेच विभागांच्या खातेप्रमुखांना घ्यायला लावली असली, तरी प्रत्यक्षात भ्रष्टाचाराने महापालिका पोखरलेलीच असल्याचे दिसून येते.
मुंबई- मुंबई महापालिकेची कार्यालये भ्रष्टाचारमुक्त करण्याची शपथ महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त तसेच विभागांच्या खातेप्रमुखांना घ्यायला लावली असली, तरी प्रत्यक्षात भ्रष्टाचाराने महापालिका पोखरलेलीच असल्याचे दिसून येते. गेल्या नऊ वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात महापालिकेतील ८८ अधिकारी व कर्मचारी रंगेहाथ पकडले गेले आहेत. त्यातील तब्बल ४१ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
[poll id=”822″]
मुंबई महापालिकेत पैसे दिल्याशिवाय अधिकारी काम करत नाहीत, असे बोलले जाते. याची प्रचिती महापालिकेची पायरी चढलेल्या प्रत्येकाला येते. त्यामुळे भ्रष्टाचाराने पोखरलेल्या महापालिकेतील भ्रष्टाचार उखडून टाकण्यासाठी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी २७ ऑक्टोबर ते १ नोव्हेबर या कालावधीत ‘भ्रष्टाचारमुक्त महापालिका’ अशा सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहात शपथ घेत लाच घेण्याच्या प्रवृत्तीपासून परावृत्त करून भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न आयुक्तांचा असला, तरी यापूर्वी मुंबईत लाच मागणे आणि स्वीकारण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेक घटनांमध्ये महापालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांना रंगेहात पकडण्यात आलेले आहे.
महापालिकेत २००५ पासून ३० सप्टेंबर २०१४ या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ६२ तक्रारी नोंद केल्या आहेत. त्यामध्ये महापालिकेच्या ८८ अधिकारी व कर्मचा-यांचा सहभाग असल्याचे सिद्ध झाले आहे. यामध्ये ४८ तासांपेक्षा अधिक तास पोलिस कोठडीत राहिलेल्या तसेच चौकशीत दोषी आढळलेल्या तब्बल ४१ अधिकारी व कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे. यात उपायुक्तांपासून वाहनचालक, शिपायांपर्यंत सर्वावरच भ्रष्टाचाराचे आरोप असून, त्यांना या प्रकरणी अटक झाल्याची माहिती प्रमुख चौकशी अधिकारी मनोहर दणाणे यांनी दिली.
महापालिकेच्या इतिहासात निवृत्त उपायुक्त काकासाहेब मस्के यांच्यापासून सहायक आयुक्त तसेच काही दिवसांपूर्वी भायखळा इमारत प्रस्ताव विभागातील कार्यकारी अभियंता सुनील राठोड, दुय्यम अभियंता बालाजी बिरासदार, सहायक अभियंता विलास खिलारे आदींना १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने अटक केली होती. यांपैकी अनेक जणांची निर्दोष सुटकाही झाली असून, काही जण तर पुन्हा सेवेतही रुजू झाले आहेत.
नगरसेवकही भ्रष्टाचारी
नव्या महापालिकेत अधिका-यांकडून भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली जात असली, तरी या महापालिकेचे विश्वस्त असलेले नगरसेवकही अधिकारी व कर्मचा-यांच्या बरोबरीने भ्रष्टाचाऱ्यांच्या यादीत आहेत. भाजपचे नगरसेवक महंत चौबे, अॅड. ज्ञानमूती शर्मा, मनसेच्या नगरसेविका श्रद्धा पाटील आदींना लाच स्वीकाराताना रंगेहात पकडण्यात आले होते.
नगरसेवक हि भ्रष्टाचारी असल्याची बाब पालिकेकडून सांगण्यात येते हे काही चुकीचे नाही. बृहन्मुंबई महानगर पालिकेने दत्तकवस्ती योजना स्थापन करून दिली आहे, तरीही मुंबईत ठीकठिकाणी कचऱ्याचा ढीग दिसतो, मुंबईतील नाले गटारे तुंबलेली दिसतात. दत्तकवस्ती योजनेतील कंत्राटदार खोटी नावे दर्शवून पालिकेकडून त्यांचा पगार दाखवितात. याबद्दल नगरसेवकांकडे तक्रार दिली तरी त्याचे निरसन होत नाही. आम्ही त्या बाबतीत लक्ष देऊ शकत नाही. साधी लादिकरण हि नगरसेवकांच्या फंडात बसत नाही, असे गटप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख सांगतात. कंत्राटदारांच्या कामगारांस गटारे नाले दाखविले तर ते चुकूनहि साफ करू नका आणि “कौन अगर बोलेगा तो हमको बोल उसका उलटा कम्प्लेंट करके पोलिस चौकिके साहब लोग से फटके मारेंगे” अश्या धमक्यासुद्धा कंत्राटदार तेथील स्थानिक नागरिकास देतात. “तुम तुम्हारा काम करो और हमारे बारेमे बोलेंगे तो बहुत मारेगा और पोलिस चौकी में सडायेगा” अशा वार्ता तेथील गुंड कंत्राटदार करतात.