नोकरी ही सर्व तरुणांची गरज आहे. हवी ती नोकरी एखाद्या ठिकाणी असते, पण त्या माहितीचा स्रोत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा माहिती असून ती संधी कॅश करता येत नाही.
नोकरी ही सर्व तरुणांची गरज आहे. हवी ती नोकरी एखाद्या ठिकाणी असते, पण त्या माहितीचा स्रोत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा माहिती असून ती संधी कॅश करता येत नाही. वर्तमानपत्रात, विविध संस्थांमध्ये, मनुष्यबळ सल्लागारांकडे कितीतरी नोकरीच्या संधीच्या जाहिराती येतात; मात्र सर्वच जण सर्वच वर्तमानपत्रं वाचू शकत नाहीत. म्हणून प्रबोधक एक अभिनव उपक्रम सुरू करीत आहे. यामध्ये प्रबोधक नोकरीची गरज असलेल्या व्यक्तीला त्यांच्या मोबाईल नंबर आणि ई-मेलवर ‘नोकरीच्या संधी’ची माहिती पुरवणार आहे.
» शासकीय नोकरीच्या विविध संधींची माहिती
» प्रसिद्धीमाध्यमातून प्रकाशित होणा-या नोकरीच्या संधीची माहिती.
» इतर सर्व ठिकाणाहून येणा-या विविध नोकरींची माहिती
त्यासाठी ‘प्रबोधक’ने तरुणांना आवाहन केले आहे की, ज्यांना नोकरीची गरज आहे, त्यांनी त्यांचे नाव, ई-मेल, शिक्षण आणि मोबाईल नंबर पाठवावे.
आत्तापर्यंत ‘प्रबोधक’कडे सहाशेच्या वर कॉलेजेस आणि पाचशेच्या वर तरुणांचे (ज्यांना प्रबोधकने मागील वर्षी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मार्गदर्शन दिले होते) त्यांचे संपर्क आहेत. त्यांना ही माहिती दिली जाणारच आहे, पण इतर तरुणांपर्यंतही माहिती पोहोचण्यासाठी तरुणांनी ‘प्रबोधक’शी संपर्क साधता येईल.
ही माहिती गोळा करण्यासाठी ‘प्रबोधक’चे जोगेश्वरी मुख्यालयातील कार्यकत्रे झटत आहेत. पुढे अधिक शिस्तबद्ध पद्धतीने विभागवार आणि क्षेत्रनिहायसुद्धा ही माहिती देता येईल.
प्रबोधक खालील माहिती पोहोचवणार आहे
अ) येणा-या विविध शासकीय नोक-या- राज्य आणि केंद्र
ब) प्रशासकीय सेवा आणि इतर स्पर्धा परीक्षा माहिती
क) खासगी नोकरीच्या संधी
ड) उद्योगाबद्दल माहिती आणि मार्गदर्शन
इ) तरुणांसाठी विविध उपयुक्त माहिती
प्रबोधक हा महाराष्ट्रातील तरुणांसाठी सामाजिक अराजकीय उपक्रम आहे.
महाराष्ट्रातील तरुणांना मानसिक आणि सामाजिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याचा महत्त्वाचा भाग म्हणून करिअर, नोकरी आणि उद्योग या बाबतीत तरुणांना मार्गदर्शन आणि माहिती देण्याचे काम प्रबोधक करीत आहे. विशेषत: महाराष्ट्रातील तरुणांनी शासकीय नोकरी आणि प्रशासकीय सेवांमध्ये यावे, जिथे महाराष्ट्रातील तरुणांची संख्या फार कमी आहे, यासाठी प्रबोधक विशेष प्रयत्न करीत आहे.
यासाठी विविध विषयांवर सेमिनार्स, मार्गदर्शनपर शिबिरे तसेच कॉलेजेस आणि शाळांमध्ये मार्गदर्शन व्याख्याने प्रबोधक आयोजित करीत आहे. सोशल मीडिया हे तरुणांपर्यंत पोहोचण्याचे अतिशय वेगवान आणि प्रभावी मध्यम आहे, असे प्रबोधकला वाटते. त्यामुळेच प्रत्यक्ष काम करीत असतानाच सोशल मीडियाचा सर्वोत्तम वापर व्हावा यासाठी प्रबोधक प्रयत्नशील आहे.
प्रबोधकचे कार्यालय १/४, शंकर निवास, बांद्रेकरवाडी, जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -६० येथे असून, त्यांच्याशी prabodhakhm@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधता येईल.
I’m inyrested