Friday, May 3, 2024
Google search engine
Homeसंपादकीयअग्रलेख‘नमो’समोर शिवसेनेचे लोटांगण

‘नमो’समोर शिवसेनेचे लोटांगण

कुठल्याही प्रश्नावर वेळोवेळी डरकाळ्या फोडणारा हा पक्ष आज शरीफ यांना निमंत्रण देण्याच्या व त्यांच्याशी चर्चा करण्याच्या प्रश्नावर अगदी मूग गिळून गप्प आहे. पाकिस्तान किकेटपटूंना भारतात खेळू देणार नाही, तो सामना होऊ देणार नाही, पाकिस्तानी कलाकारांचे, संगीतकारांचे कार्यक्रम येथे होऊ देणार नाही, अशा डरकाळ्या फोडणा-या शिवसेनेचे आता अगदी मांजर झाले आहे.

uddhav-thackerayनरेंद्र मोदी यांच्या सोमवारी होणा-या शपथविधीला इतर अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्याबरोबरच ‘सार्क’ देशांच्या राष्ट्रप्रमुखांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. यातील काही देशांच्या राष्ट्रप्रमुखांना निमंत्रण देण्यावरून वाद आणि वादंग निर्माण झाले असताना व त्याबाबत बरीच टीका होत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे या शपथविधी समांभाला उपस्थित राहतात की नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता. पाकिस्तानमधील कट्टरवाद्यांचा तसेच तेथील लष्कराचा शरीफ यांच्या भारतभेटीला विरोध असल्याने ते या शपथविधीला न येता एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याला पाठवतील, असे वाटत होते. परंतु अखेर दस्तुरखुद्द नवाझ शरीफ हे आजच्या समारंभाला हजर राहण्यासाठी येत आहेत. पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख प्रथमच भारताच्या पंतप्रधानांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहत आहेत, ही विशेष बाब होय. त्यांच्याबरोबर त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्रमंत्री सरताझ अझीझ हे असणार आहेत. नवाझ शरीफ हे दिल्लीतील शपथविधी समारंभाला येणार नाहीत, अशी दाट शंका होती. परंतु एक वर्षापूर्वी शरीफ पुन्हा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी पाकिस्तानला भारताशी चांगले संबंध ठेवायचे आहेत, अशी घोषणा केली होती. शरीफ यांना काश्मीर आणि अन्य प्रश्न सोडवायचे असल्याने व भारत पाकिस्तान चर्चेसाठी त्यांची नेहमीच तयारी असल्याने शपथविधी समारंभाच्या निमित्ताने मिळणारी ही संधी पक्के राजकारणी असलेले शरीफ कशाला दवडतील? या पार्श्वभूमीवर, शरीफ यांनी दिल्लीत यायचे ठरवले तर नवल नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेसुद्धा शरीफ यांनी उपस्थित राहावे, अशी शिफारस केली आहे. आपल्या या भेटीबाबत शरीफ यांनी आपल्या सहका-यांशी आणि वरिष्ठ लष्करी अधिका-यांशी चर्चा केली. शपथविधीच्या दुस-या दिवशी म्हणजे २७ मे रोजी द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे. या आधी दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये तसेच सचिव पातळीवर अनेक वेळा चर्चा झाल्या; पण, काश्मीर व इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यातून काही निष्पन्न झाले नाही. येथे एक लक्षात घेतले पाहिजे की, पाकिस्तानने भारताशी चर्चा करण्याची कितीही तयारी दाखवली असली व शांततेचे कितीही गोडवे गायले असले तरी पाकिस्तानचे दाखवायचे दात वेगळे असतात व खायचे दात वेगळे असतात. पाकिस्तानचे दुटप्पी धोरण, सीमेवरील पाकिस्तान सैनिकांकडून होणा-या कुरापती, सतत होणारा गोळीबार, भारतीय जवानांच्या हत्या, पाकिस्तानची चिथावणी आणि पाकस्थित दहशतवादी संघटनांकडून भारतात होणारी दहशतवादी कृत्ये, या बाबी लक्षात घेता संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने पाकिस्तानशी फारशा वाटाघाटी केल्या नव्हत्या. पाकिस्तान सैनिकांनी जेव्हा जेव्हा आगळीक केली व भारतीय जवानांची हत्या केली तेव्हा सरकारने पाकिस्तानला कडक शब्दात ताकीद दिली. परंतु भाजपने लोकसभेत अशा प्रकरणांमध्ये सरकारला धारेवर धरले व सरकार बोटचेपेपणाचे धोरण स्वीकारत असल्याची टीका केली. पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारण्यात यावे, असाही सूर लावला. आता भाजप सत्तेवर आल्याबरोबर त्याने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शपथविधी सोहळ्यासाठी बोलावले, एवढेच नव्हे तर पाकिस्तान पंतप्रधानांशी चर्चाही होणार आहे. शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारले पाहिजेत, हे चांगले धोरण आहे. पण आपण करतो ते सर्व चांगले आणि  तीच गोष्ट इतरांनी केली तर ते देशविघातक हे धोरण सुसंगत नाही. पाकिस्तानशी चांगल्या वातावरण निर्मितीसाठी व उपखंडात शांतता नांदण्यासाठी भाजपचे नवे सरकार सहकार्याचा हात पुढे करत आहे; पण, हा हात पुढे करताना पाकिस्तानचे अजूनपर्यंतचे नापाक मनसुबे व इतिहास लक्षात घेऊन भारताने सावध पावले टाकली पाहिजेत. या सर्व हालचालीत आश्चर्य वाटते ते शिवसेनेचे. शिवसेना हा ‘रालोआ’मधील एक महत्त्वाचा घटक पक्ष. कुठल्याही प्रश्नावर वेळोवेळी डरकाळ्या फोडणारा हा पक्ष आज शरीफ यांना निमंत्रण देण्याच्या व त्यांच्याशी चर्चा करण्याच्या प्रश्नावर अगदी मूग गिळून गप्प आहे. पाकिस्तान किकेटपटूंना भारतात खेळू देणार नाही, तो सामना होऊ देणार नाही, पाकिस्तानी कलाकारांचे, संगीतकारांचे कार्यक्रम येथे होऊ देणार नाही, अशा डरकाळ्या फोडणा-या शिवसेनेचे आता अगदी मांजर झाले आहे. पाकिस्तान आपल्या जवानांचे सीमेवर रक्त सांडत असताना पाकिस्तानी खेळाडूंशी कसले खेळता, असे विचारणारी आणि वानखेडेची खेळपट्टी खणून काढणारी शिवसेना शरीफ यांना देण्यात आलेल्या निमंत्रणाबाबत तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प का आहे? शिवसेना असे दुटप्पी वर्तन करत असताना ‘रालोआ’तील एक घटक पक्ष ‘एमडीएमके’ श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्षे यांना निमत्रंण देण्यात आल्याबद्दल संतप्त झाली असून या पक्षाचे नेते वायको यांनी भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांची भेट घेऊन आपला विरोध नोंदवला. विशेष म्हणजे या पक्षाचा एकही खासदार निवडून आलेला नाही. असे असूनही या पक्षाने आपला विरोध तीव्रपणे दर्शवला आहे. पण १८ खासदार निवडून आलेले असूनही सेनेने शरीफ यांच्या प्रश्नावर आपली तलवार म्यान केली आहे. याचे एक कारण म्हणजे शिवसेनेचे डोळे आता मंत्रीपदाच्या खुच्र्याकडे लागले आहेत व या खुच्र्या त्यांना खुणावत आहेत. दुसरे कारण म्हणजे ज्या महाराष्ट्रातील युतीत शिवसेनेचे अजूनपर्यंत वर्चस्व व दरारा होता तो या लोकसभा निवडणुकीत खूपच कमी झाला आहे. आता महाराष्ट्रात भाजपचे वर्चस्व वाढले आहे. ही बाब शिवसेना नेत्यांच्या लक्षात आल्याने त्यांना आता नमते घेतल्यावाचून पर्याय उरलेला नाही. शिवसेना आता सगळ्याच बाबतीत बॅकफूटवर आहे. मुंबई महापालिकेत सध्या शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे; परंतु, निवडून आलेल्या काही भाजप खासदारांनी नुकतीच मुंबईच्या विकास प्रकल्पांबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा केली. या चच्रेत भाजपने युतीतील आपला सहकारी शिवसेनेला अंधारात ठेवले. भाजप आज आपला आवाज चढवते आहे, याचे कारण अजूनपर्यंत युतीमध्ये शिवसेनेने मोठय़ा भावाची व दरडावण्याची भूमिका बजावली. भाजपने दरवेळी नमती भूमिका घेतली. निवडणुकीपूर्वी भाजप नेते नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अनौपचारिक भेट घेतली. तरीसुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आकांडतांडव केले व भाजप नेत्यांना अपमानास्पद वागणूक दिली. शेवटी भाजपच्या अन्य नेत्यांना उद्धव ठाकरे यांची समजूत काढावी लागली. भाजप नेत्यांनी हे सगळे सहन केले. पण आता निवडणूक निकालानंतर परिस्थिती बदलली आहे. महाराष्ट्रात तर भाजपच्या जागा वाढल्याच आहेत; पण, शिवसेनेला ज्या जागा मिळाल्या त्या मोदी लाटेमुळेच मिळाल्या, असेच भाजप नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. म्हणूनच भाजपने शिवसेनेला खडसावले आहे की, पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रित करणे, हा परराष्ट्र धोरणाचा एक भाग आहे व त्यात कुणी लुडबुड करू नये. शिवसेनेवर अशाच थपडा खाण्याची वेळ या पुढे येणार आहे. ‘घी देखा, लेकिन बडगा नही देखा’, असेच भाजप नेते आता म्हणत असतील.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. प्रहार वाले अजून सुधरायला तयार नाही . स्वताचे काय चुकले ते आधी बघा मग नंतर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट