‘मै हू रजनीकांत’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
चेन्नई – ‘मै हू रजनीकांत’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
‘या चित्रपटामुळे माझ्या चाहत्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. तसेच याबाबत चित्रपट निर्मात्यांनी माझ्याकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती, असे रजनीकांत यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. तसेच मानहानीचा आरोपही त्यांनी याचिकेत केला आहे.
दरम्यान, न्यायमूर्ती एस. तामिलवनन यांनी सुनावणीदरम्यान ‘मै हू रजनीकांत’ या हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनावर तात्पुरती बंदी आणण्याचे आदेश दिले आहेत.
फैझल सैफ यांनी या ‘मै हू रजनीकांत’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर आदित्य मेनन हे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. यासोबतच कविता राधेश्याम, स्मिता गोंदकर, रीमा लागू, सुनिल पाल, गणेश यादव आणि शक्ती कपूर यांच्याही भूमिका आहेत. वर्षा प्रॉडक्शनची ही निर्मिती आहे.
रजनीकांत तो एक हि है ,ये दुसरा ” रजनीकांत ” कहासे पैदा हुआ ????????,