बॉलीवूड अभिनेत्री बिपाशाने ट्विटरद्वारे आपल्यात आणि हरमन बवेजामध्ये प्रेमसंबध असल्याचे जाहीर केले.
मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून हरमन आणि बिपाशाचे प्रेमसंबध असल्याच्या चर्चेला बिपाशा बासूने बुधवारी पूर्णविराम दिला. बॉलीवूड अभिनेत्री बिपाशाने ट्विटरद्वारे आपल्यात आणि हरमन बवेजामध्ये प्रेमसंबध असल्याचे जाहीर केले.
‘होय, मी आणि हरमन एकमेकांच्या प्रेमात आहोत.अखेर माझ्या आयुष्यात माझ्यापेक्षा अधिक चांगल्या व्यक्तीने प्रवेश केला. माझ्यावर देवाची कृपादृष्टी आहे.’ असे तिने ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
याआधी हरमनने आपले बिपाशाशी प्रेमसंबध असल्याचे सांगितले होते मात्र बिपाशाने त्यावर काहीच कमेंट केली नव्हती. अखेर बुधवारी तिने याबाबतीतले मौन सोडले. तसचे हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
Stating the obvious!Yes Harman n Me r a couple 🙂 Finally I have met a person who is a far better human being than I am.Blessed.
— Bipasha Basu (@bipsluvurself)
Good news