रस्त्याने चालणा-या महिलांच्या गळय़ातील मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार वाढत असताना चोरटयांनी ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
कल्याण – रस्त्याने चालणा-या महिलांच्या गळय़ातील मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार वाढत असताना चोरटयांनी ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन दिवसांत कल्याण-डोंबिवलीत घडलेल्या विविध घटनांत चोरटय़ांनी चार वयोवृद्धांकडील तब्बल ७ लाख ८९ हजार रुपये किमतीचा ऐवज लांबवल्याचे समोर आले आहे.
पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील श्री महावीरनगर येथील ६२ वर्षीय वृद्धा ललिता शास्त्री सकाळच्या सुमारास रस्त्याने जात असताना त्यांच्याकडे असलेल्या पर्समधील अडीच लाख रुपयांचे दागिने चोरटय़ांनी लांबवले. दुसरी घटना नांदिवली परिसरात घडली. शिवनेरी सोसायटीत राहणा-या पार्वती कोन्नू स्वामी या सकाळी नातीला शाळेच्या बसमध्ये बसवून घरी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या लुटारूंनी त्यांच्या गळय़ातील १ लाख ४० हजारांची सोनसाखळी हिसकावल्याचा प्रकार घडला.
तिसरी घटना डोंबिवलीतील चिपळूणकर रस्त्यावरील परदेशी मेन्शन सोसायटीतील हेमलता देढिया यांच्या घरी घडली. त्या घरात एकटय़ा असताना केबलचालक असल्याचे सांगून एक जण त्यांच्या घरात शिरला. त्यांना बोलण्यात गुंतवून त्याने घरातून ३५ हजारांचा ऐवज लंपास केला. चौथी घटना मानपाडा परिसरात घडली.
शलाका सोसायटीत राहणा-या लक्ष्मी चांदेमंडन या ७२ वर्षीय महिला सकाळच्या सुमारास दळण घेऊन जात होत्या. त्या वेळी इमारतीच्या जिन्याखाली दबा धरून बसलेल्या चोरटय़ाने त्यांच्या गळय़ातील ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. वृद्धाच्या असहायतेचा फोयदा घेऊन चोरटय़ांनी त्यांच्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.
ह्याना पकडून लोकांनीच त्यांचे हात पाय तोडावेंत,