मुंबई सेंट्रल या स्थानकाच्या हद्दीत गर्दुल्ल्यांचा भरदिवसा वावर वाढत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर व पादचारी पुलावरून जाताना महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
मुंबई- पश्चिम रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकापैकी एक असलेले व अत्याधुनिक सेवासुविधा व प्रचंड सुरक्षा असलेले स्वच्छ व सुंदर स्थानक म्हणून मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकाची ख्याती आहे. मात्र सध्या या स्थानकाची ओळख बदलत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई सेंट्रल या स्थानकाच्या हद्दीत गर्दुल्ल्यांचा भरदिवसा वावर वाढत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर व पादचारी पुलावरून जाताना महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे एका महिला प्रवाशांकडून सांगण्यात आले.
मुंबई सेंट्रल हे स्थानक लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठीही असल्याने या स्थानकांतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे या स्थानकात प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. त्याचप्रमाणे या स्थानकात प्रचंड सुरक्षा असते. मात्र लोकल व लांबपल्ल्यांच्या गाडय़ा यामधील जागेत सध्या गर्दुल्ले दिवसाढवळ्या सरार्सपणे नशा करताना आढळून येतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा दावा रेल्वे पोलिस करत असले, तरीही हे चित्र पाहता, प्रवाशांची सुरक्षा रामभरोसेच म्हणावी लागेल.
रेल्वेच्या हद्दीत गर्दुल्ल्यांचा वावर वाढत असला तरीही, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांच्या मनुष्यबळाचा अभाव आहे. ते वाढवण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. कमी मनुष्यबळामुळेच या गर्दुल्ल्यांचा वावर इथे पाहायला मिळत असल्याची माहिती रेल्वेच्या एका अधिका-यांने नाव न छापण्याच्या अटीवर ‘प्रहार’ला दिली आहे.
मुंबईत गर्दुल्ल्यांचा वावर वाढत आहे हे का पोलीस पाटलांचे काम आहे का? बर त्या गर्दुल्ल्यांला पकडले तरी मुंबई पोलिसांना कोणते पदक किंवा कोणती अनामत रक्कम ते जमा करू शकतात का, जेणेकरून त्यांना मानचिन्ह मिळणार आहे. लोकल गाड्यांत किती प्रवाशी फुक्कट चढतात त्यांनी तिकिटे काढली किंवा नाही हे पाहण्याचे काम तिकीट तपासणीस करेल तरी कसा? सर्व नागरिकांची कामावर जाण्याची वेळ सकाळी ८ ते ११ दरम्यानची या एवढ्या गर्दीत एखादा तरी तिकीट तपासणीस उभा तरी राहू शकेल का ? म्हणे गर्दुल्ले वाढत चालले आहे. मुंबई सारख्या शहरात परप्रांतीय कसे आले याची कधी चौकशी झाली नाही, तर गर्दुल्ल्याना पकडून तरी काय उपयोग आधीच तो इथे मारतोय, म्हणतात ना मरे हुये को क्या मारना ? म्हणून रेल्वे पोलीस त्यांना मोकाट सोडून देतात.