पुण्यातल्या कोथरुड येथील भाजपाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.
पुणे- पुण्यातल्या कोथरुड येथील भाजपाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. उपचारांना त्या प्रतिसाद देत असल्याचे कुटुंबियांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून मेधा यांना ताप आणि सर्दी होती. त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यावर रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. मेधा कुलकर्णी यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे आढळून आल्याने काळजी करण्यासारखी कोणतीही स्थिती नाही, असे पुणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिका-याने सांगितले.
मात्र देशभरात या आजाराची साथ वेगाने पसरत आहे. आतापर्यंत देशात ७०४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात राज्यातील मृतांची संख्या ८३ इतकी आहे.
ताई तुम्ही लवकर बऱ्या व्हाल ! अशी प्रार्थना करतो ,!